Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसार भारतीमध्ये नवी भरती! मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी संधी, अशी करा अर्ज प्रक्रिया

भारताचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत दूरदर्शन (DDK), आकाशवाणी व CBS अंतर्गत रायपूर, मुंबई, पटना, भोपाळ आदी शहरांत नियुक्ती होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 11, 2026 | 03:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसार भारतीकडून मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, यासाठी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत दूरदर्शन केंद्र (DDK), आकाशवाणी तसेच कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (CBS) अंतर्गत विविध शहरांमध्ये पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायपूर, जालंधर, पटना, मुंबई, भोपाळ, रांची यांसारख्या शहरांचा समावेश आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

Career News: शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात पाच दिवसीय राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन उत्साहात पार!

ही भरती मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असून, प्रसार भारतीच्या विविध युनिट्समध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. मीडिया, जाहिरात आणि विक्री क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मॅनेजमेंट संस्थेतून MBA / MBA (Marketing) किंवा PG Diploma in Management / Marketing असणे आवश्यक. यासोबतच किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. ज्यांना मीडिया संस्थांमध्ये डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे तसेच वयोमर्यादेची गणना भरती अधिसूचनेच्या तारखेपर्यंत केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया (स्टेप बाय स्टेप)

  • या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करण्यासाठी पुढील पायऱ्या पाळाव्या लागतील –
  • सर्वप्रथम avedan.prasarbharati.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • तिथे “Marketing Executive at various CBS/DDK/Akashvani” या पर्यायाखाली Apply Now वर क्लिक करा.
  • लॉगइन पेज उघडल्यानंतर, नवीन उमेदवार असल्यास Register New User वर क्लिक करा.
  • आपला मोबाईल नंबर नोंदवा. त्या नंबरवर OTP येईल.
  • OTP व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला पासवर्ड मिळेल.
  • मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • सर्व तपशील तपासून Final Submit करा.

Washim News: ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ हा विशेष सप्ताह साजरा करण्यात आला!

अडचण असल्यास काय कराल?

अर्ज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवार avedanhelpdesk@gmail.com या ई-मेल आयडीवर आपल्या समस्येचा स्क्रीनशॉट पाठवून संपर्क साधू शकतात. मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रसार भारतीची ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: New recruitment at prasar bharati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित
1

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित

स्पर्धा परीक्षांच्या २०० पुस्तकांचे वाटप! पोलिस अधिकारी पाटील यांचा पुढाकार
2

स्पर्धा परीक्षांच्या २०० पुस्तकांचे वाटप! पोलिस अधिकारी पाटील यांचा पुढाकार

Small Business Ideas: कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय! ‘हे’ 8 भन्नाट कल्पना तुम्हाला करून देतील बंपर कमाई
3

Small Business Ideas: कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय! ‘हे’ 8 भन्नाट कल्पना तुम्हाला करून देतील बंपर कमाई

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
4

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.