Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

Bullet Train Jobs: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग होण्याची सुवर्णसंधी! NHSRCL मधील ज्युनियर इंजिनिअर आणि मॅनेजर पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 27, 2026 | 02:52 PM
railway

railway

Follow Us
Follow Us:

Bullet Train Jobs: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात काम करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल किंवा तुम्ही अशा सरकारी नोकरीच्या शोधात आहात का, जिथे उत्तम पगारासोबतच देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा भाग होण्याची संधी मिळेल. तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) विविध पदांवर भरतीसाठी जाहीर केली आहे.

निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ४०,००० ते १.२५ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. याशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सेवा-सुविधांचा लाभ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेतील पात्रता निकष व अटी काय आहेत ?

किती पदांसाठी होणार भरती?

NHSRCL च्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २२४ पदांपैकी २०९ पदे नॉन-एग्झिक्युटिव्ह (Non-Executive) आणि १५ पदे एग्झिक्युटिव्ह (Executive) श्रेणीतील आहेत. यामध्ये अनेक तांत्रिक (Technical) आणि परिचालन (Operational) पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ज्यामध्ये प्रामुख्याने ज्युनियर इंजिनिअर, स्टेशन मॅनेजर, ट्रेन मॅनेजर, ऑपरेशन कंट्रोलर, आयटी (IT) विभाग आणि सुरक्षा विभागातील पदे, इतर एग्झिक्युटिव्ह आणि नॉन-एग्झिक्युटिव्ह पदांचा समावेश आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल प्रकल्पात काम करण्याची आणि देशाच्या आधुनिक रेल्वे नेटवर्कच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळेल.

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येईल?

या भरती मोहिमेअंतर्गत २०९ नॉन-एग्झिक्युटिव्ह आणि १५ एग्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज प्रक्रिया १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १४ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना NHSRCL च्या www.nhsrcl.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय?

शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश तांत्रिक पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेड किंवा विषयातील डिप्लोमा (Diploma), बीई (BE) किंवा बीटेक (BTech) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, काही विशेष पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द! पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये निर्माण झाला संताप

वयोमर्यादेचा विचार केल्यास, उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तथापि, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहिती किंवा इतर अपडेट्ससाठी उमेदवार NHSRCL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Web Title: Nhsrcl recruitment 2026 bullet train jobs executive non executive posts apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • central railway
  • education
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
1

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
2

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
3

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
4

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.