Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणावर अर्थमंत्र्यांचे मोठे वक्तव्य; विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल नेमकं काय बोलल्या? जाणून घ्या

NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आणि विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च असल्याचे आश्वासन दिले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 25, 2026 | 01:16 PM
neet paper leak

neet paper leak

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak: दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकार या मुद्द्याकडे अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पेपर लीकसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर त्वरित आणि कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक

यादरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पेपर लीकसारख्या घटना घडल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी हे आव्हान स्वीकारत आपली तयारी आणखी मजबूत केली आणि पुन्हा झालेल्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली.
पुन्हा तयारी करण्याची संधी मिळाल्यामुळे आपला परफॉर्मन्स आधीपेक्षाही चांगला झाला, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे.

सरकारने उचलली वेळेत पावले

अर्थमंत्र्यांच्या मते, पेपर लीकची माहिती समोर आल्यानंतर सरकारने तातडीने कारवाई केली. त्यानुसार या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले. वेळेत पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आली. परीक्षेचा निकालही निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आला. आता विद्यार्थी त्यांच्या योग्यतेच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (मेडिकल कॉलेज) प्रवेश घेत आहेत. कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याचे भविष्य धोक्यात येऊ नये, हे सुनिश्चित करणे हाच सरकारचा उद्देश होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

TET Paper Leak: महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गजाआड; अखेर बिहारमधून कशी झाली मोठी कारवाई?

विद्यार्थ्यांचे भविष्य सर्वोच्च प्राधान्य

परीक्षा, पेपर लीक आणि फेरपरीक्षा यांसारखे विषय थेट विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि भविष्याशी जोडलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे, असे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले.
जर सरकारने या विषयावर गांभीर्य दाखवले नसते किंवा कोणतीही कारवाई केली नसती, तर विरोधी पक्षांचे प्रश्न योग्य मानले गेले असते. परंतु, सरकारने पंतप्रधान स्तरावरून यावर प्रतिक्रिया दिली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

MBBS in Russia Fees: रशियात एमबीबीएस करणे किती स्वस्त? जाणून घ्या ट्यूशन फी आणि राहण्याचा खर्च..

जंतर-मंतरवर निदर्शने सुरूच

दुसरीकडे, नीट पेपर लीक प्रकरणावरून जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि विविध संघटनांची निदर्शने अद्यापही सुरू आहेत. परीक्षा प्रणालीत सुधारणा करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि जबाबदारी निश्चित करणे यांसारख्या मागण्या आंदोलक करत आहेत. सरकार आणि आंदोलकांमध्ये संवादाचा सिलसिलाही सुरू आहे. आता सरकार पुढे कोणती पावले उचलते आणि परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी कोणते नवीन निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nirmala sitharaman statement on neet paper leak controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.