
teaching job
शासनाच्या ११ ऑगस्ट २०२६च्या निर्णयानुसार रिक्त शिक्षकेत्तर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्तीचा मार्ग अवलंबणे बंधनकारक आहे. या दोन्ही प्रक्रियेनंतरही पदे रिक्त राहिल्यास संचमान्यतेनुसार निश्चित रिक्त पदांच्या ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार आहेत.
सरळसेवा भरतीसाठी संस्थांनी अद्ययावत बिंदूनामावली तपासून घेणे, जाहिरातीचे प्रारूप तयार करून संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. जाहिरात स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांसह संस्थेच्या संकेतस्थळावर आणि शाळेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. अर्ज, छाननी, मुलाखत आणि अंतिम निवडीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे राहणार आहे. नियुक्तीचा सुरुवातीचा तीन वर्षांचा कालावधी मानधनावर असेल. तसेच मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण करून त्याची नोंद संस्थेला जतन करावी लागणार आहे.
दिंनाक २८ मे २०२५पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थसंबंधी कार्यवाहीदेखील याच पोर्टलवरून करावी लागणार आहे. पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.