फोटो सौजन्य- सोशल मीडिया
अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना घाईत नाव आई वडिलांचे नाव किंवा इतर तपशिलांमध्ये टायपिंगच्या चुका होतात. ही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन एनटीएने स्पष्ट केले आहे की ठरवून दिलेल्या मुदतीत पोर्टलवर आवश्यक बदल करता येतील. यूजीसी नेटच्या करेक्शन विंडोद्वारे कोणते तपशील बदलता येऊ शकतात हे आता आपण जाणून घेणार आहोत.
उमेदवार त्यांच्या ऑनलाइन अर्जपत्रात आपले नाव, आपल्या वडिलांचे नाव किंवा आपल्या आईच्या नावापैकी कोणत्याही एका तपशिलामध्ये सुधारणा (रिवाज) करू शकतात.
मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, कायमस्वरूपी आणि तात्पुरता पत्ता (परमानेंट आणि प्रेझेंट ॲड्रेस), तसेच छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी (सिग्नेचर – अपलोड केलेल्या इमेज) यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म सबमिट करताना या गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
NTA UGC NET २०२६: यूजीसी नेट डिसेंबर २०२६ चे अपडेट्स एनटीएच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहू शकता.
ONGC Apprentice Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये ३०४७ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; आजच करा अर्ज
शेवटच्या वेळेची वाट पाहू नका: फॉर्ममध्ये करेक्शनसाठी ४ नोव्हेंबरच्या रात्री ११:५० वाजेपर्यंतची वेळ आहे. परंतु, शेवटच्या वेळेकडील सर्व्हरवरील गर्दी टाळण्यासाठी आज किंवा उद्याच करेक्शनचे काम पूर्ण करून घ्यावे.
दस्तावेजांशी पडताळणी करा: नाव किंवा आई-वडिलांचे नाव बदलताना खात्री करून घ्या की स्पेलिंग तुमच्या १० वीच्या किंवा पदवीच्या (ग्रॅज्युएशच्या) मार्कशीटशी तंतोतंत जुळत आहे.
सायबर कॅफेची काळजी: जर तुम्ही कोणत्याही कॅफेमधून फॉर्म दुरुस्त करून घेत असाल, तर सबमिट करण्यापूर्वी स्क्रीनवरील प्रत्येक स्पेलिंग अत्यंत काळजीपूर्वक तपासून घ्यावे.
Ans: अर्जात सुधारणा करण्यासाठीची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) ही आहे.
Ans: या विंडोद्वारे उमेदवार केवळ स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा आईच्या नावापैकी कोणत्याही एका तपशिलामध्ये सुधारणा करू शकतात.
Ans: मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, कायमस्वरूपी व तात्पुरता पत्ता, तसेच अपलोड केलेले छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी (सिग्नेचर) यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.






