Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

CET: केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वी जागा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या एजंट, मध्यस्थ किंवा खाजगी समुपदेशकांच्या अवाजवी प्रलोभनांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 08:44 PM
Career NEws

Career NEws

Follow Us
Follow Us:
  • तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार
  • प्रवेश प्रक्रियाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार 
  • त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई
मुंबई/नीता परब: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या फेऱ्या सुरू आहेत. या प्रवेशाच्या फेऱ्या संपल्यानंतर संस्थास्तरीय प्रवेशाची (Career) फेरी सुरू होणार आहे. ह्या संस्थात्मक फेरी पारदर्शक होण्यासाठी सीईटी कक्षाने काही उपाययोजना केल्या आहेत. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाने संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

काही निवडक खाजगी महाविद्यालयांवर निरीक्षकाची नियुक्ती होणार आहे. तसेच या प्रवेश प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे.  तसेच यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. यांशिवाय विद्यार्थी व पालकांनी मध्यस्थ किंवा खाजगी समुपदेशकांच्या प्रलोभनांना बळी पडू नये तसेच सोशल मीडियाद्वारे दिशाभूल माहितीपासून सावध रहावे, त्याऐवजी  विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनासाठी सीईटी कक्षाच्या विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

शैक्षणि‍क वर्ष २०२६-२७ करीता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियामध्ये सर्व सहभागी संस्था, उमेदवार व पालकांना याद्वारे सूचित करण्यात आके असून यात, संस्थात्मक कोटा आणि केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेच्या  फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या  जागांसाठीच्या संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती पुस्तिकेत  दिलेल्या निर्देशांचे  पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

याकरीता शैक्षणिक संस्थानी संबंधित कार्यवाही करावी 

महाविद्यालयांनी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसारच राबवणे बंधनकारक आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रकियेच्या सर्व फेऱ्या पूर्णपणे समाप्त झाल्यानंतरच संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जावी. सर्व जागांचे वाटप अर्जदार उमेदवारांच्या गुणवत्तेनुसारच केले जावे. उमेदवारांना प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे म्हणून महाविद्यालयांनी आपले प्रवेश नियम, कार्यपद्धती आणि माहिती पुस्तिका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवार थेट संबंधित महाविद्यालयात अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या कॅप पोर्टल लॉगिनद्वारे संस्थास्तरीय पर्याय अर्ज सादर करू शकतात. यानंतर महाविद्यालयांनी थेट आलेले अर्ज आणि सीईटी कक्षाकडून मिळालेली उमेदवार यादी या दोन्हीचा विचार करून अधिकृत गुणवत्ता याद्या प्रवर्गानुसार तयार कराव्यात.  सदर गुणवत्ता याद्या महाविद्यालयाच्या सूचना फलकावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.

प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या आणि प्रवेश निश्चित केलेल्या  विद्यार्थी/पालक/नातेवाईकांची दैनंदिन नोंद प्रत्येक दिवशी प्रवेश प्रक्रियानंतर अहवाल सीईटी/प्रवेश नियामक प्राधिकरण यांस ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे.  विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर, संस्थेने तो प्रवेश तात्काळ अधिकृत कॅप पोर्टलवर नोंदवणे, तसेच सीईटी कक्षास कळविणे बंधनकारक आहे.

निरीक्षकांची नियुक्ती

पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी, निवडक खाजगी महाविद्यालयांमधील संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल. हे निरीक्षक कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी तयार करणे, शुल्क भरणा आणि जागा वाटप यावर देखरेख ठेवतील आणि दररोज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाकडे अनुपालन अहवाल सादर करणार आहेत.

व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

या व्यतिरिक्त, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया, विशेषतः कागदपत्र पडताळणी व जागा वाटप खोली/ हॉल सीसीटीव्ही देखरेखीखाली असावी.सदर सीसीटीव्ही  व्हिडिओ रेकॉर्डिंग विहित मुदतीसाठी सुरक्षित ठेवावे आणि ते तपासणी, ऑडिट किंवा तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकरणाने मागितल्यास, महाविद्यालयाने  उपलब्ध करून द्यावे.

विद्यार्थी व पालकांना सूचना

उमेदवार आणि पालकांना कळविण्यात येते की, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वी जागा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या एजंट, मध्यस्थ किंवा खाजगी समुपदेशकांच्या अवाजवी प्रलोभनांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. तसेच सोशल मीडिया किंवा खाजगी लिंक्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे.

MHT CET Admission 2026: कृषी अभ्यासक्रम प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; ऑनलाईन अर्जासाठी ‘ही’ आहे नवीन अंतिम तारीख!

विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क

प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सीईटी कक्षाच्या राज्यातील ३६ जिल्हानिहाय  विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क साधावा.  https://sac.maharashtracet.org/mhcet/submit-ticket या लिंकवर या विद्यार्थी सहाय्यता केंद्राची  उपलब्ध होईल,।असे सांगण्यात आले आहे.

त्रुटी आढळल्यास कारवाई

संबंधित संस्थांनी माहिती पुस्तिकेतील नियमांचे तंतोतंत पालन करूनच प्रवेश प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दुर्लक्ष आढळल्यास, संबंधित संस्थेवर तात्काळ कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Observer appointed institute level rounds technical education process be video recording cet career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • Career News
  • CCTV
  • CET
  • CET Exam

संबंधित बातम्या

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
1

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
2

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.