Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील पेपरफुटी सह विद्यापीठांचा प्रश्न ऐरणीवर; सत्यजित तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यात सततच्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्य़ांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याचापार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2025 | 01:05 PM
राज्यातील पेपरफुटी सह विद्यापीठांचा प्रश्न ऐरणीवर; सत्यजित तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यातील पेपरफुटी सह विद्यापीठांचा प्रश्न ऐरणीवर; सत्यजित तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडलीच पाहिजे आणि सततच्या पेपर फुटीच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा करून समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती तांबेंनी राज्यपालांना केली आहे.

राज्यातील अनेक प्राध्यापक पदं रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांची भरती ही विद्यापीठ स्तरावर करण्यात यावी. तसेच कोविड-19 महामारीमुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले असून, अद्यापही शैक्षणिक चक्र सुरळीत झालेले नाही. प्रवेश प्रक्रिया उशिरा होणे, परीक्षा वेळापत्रकाची घाई, आणि निकाल विलंब यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. त्याचबरोबर वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जातात किंवा रद्द होतात. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रम प्रवेश आणि शैक्षणिक नियोजनावर विपरीत परिणाम होत असल्याचे सत्यजीत तांबेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडांगण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या सुविधांची तातडीने उपलब्धता सुनिश्चित केली जावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतरही अपेक्षित बदल शैक्षणिक प्रक्रियेत होत नसल्याने धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असल्याने त्यांची भेट घेतली. विद्यापीठांच्या प्रश्नाबाबत वारंवार विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटना प्रश्न माझ्याकडे मांडत होते. त्यांचे प्रश्न राज्यपालांकडे मांडण्याचा प्रयत्न केला. सी. पी. राधाकृष्णन यांचा राज्यपाल म्हणून दोन तीन राज्यांचा अनुभव आहे. ते संपूर्ण राज्यभर फिरून समस्या जाणून घेत आहेत. आता पर्यंत त्यांचे २५ जिल्ह्यांचा दौरा झाला आहे. त्यांची ही गोष्ट खूप भावणारी असल्याने त्यांचे अभिनंदन देखील केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी देखील हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.

पेपर फुटीवर कायदा करावा- तांबे

पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत असून, यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात पेपर फुटणार नाही. यासाठी पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी राज्यपालांकडे केली.

Web Title: On the issue of paperless universities in the state satyajit tambe met the governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Educational News
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात
1

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ
2

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती! मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, पोलिसांकडून लाठीचार्ज
3

अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती! मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, पोलिसांकडून लाठीचार्ज

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी
4

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.