Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

Pavitra Portal Teacher Recruitment: पवित्र पोर्टलद्वारे खासगी शाळांमधील १०,३२८ पदांसाठी मुलाखतीचे नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान मुलाखती होणार आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 01, 2026 | 12:37 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पवित्र पोर्टलवर ११,४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस
  • मुलाखतीसह निवड प्रकारातील रिक्त पदे १०,३२८
  • ३ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी
सोनाजी गाढवे, नवराष्ट्र पुणे

Pavitra Portal Teacher Recruitment:  राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे निश्चित निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मध्ये प्राप्त गुण, शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता या साठी ९० गुण असतील तर संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण राहणार असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे. संबंधित मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी दि. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी दोन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले, तर एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली होती.

दरम्यान, दि. १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन प्रकारांतर्गत शाळांच्या जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्टदरम्यान प्राधान्यक्रम मागविण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात एक लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.

यापूर्वी मुलाखतीशिवाय निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील टप्पा-१ च्या नियमित फेरीतील १३ हजार ११९ रिक्त पदांसाठी २७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या चार हजार ३९० पदांसाठी रूपांतरित फेरीची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे.

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

२५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती पूर्ण होणार

निवड प्रक्रियेत शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील ‘डाउनलोड’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत

पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भात तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहावी ते दहावीच्या पदांसाठी सर्वाधिक शिफारसी

पद प्रकार मुलाखतीसह रिक्त पदे शिफारस होत असलेल्या उमेदवारांची संख्या
पहिली ते पाचवीसाठी १,६०९ ४,४७८
इयत्ता सहावी ते आठवीसाठी ४,५०५ १०,७९२
इयत्ता नववी ते दहावीसाठी ४,२१४ ११,८८४
एकूण १०,३२८ २७,१४५

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

आकडेवारीचा दृष्टीक्षेप

  • मुलाखतीसह निवड प्रकारातील रिक्त पदे – १०,३२८
  • शिफारस झालेले उमेदवार – ११,४९३
  • शिफारस झालेले प्राधान्यक्रम – २७,१४५
  • मुलाखतीचा कालावधी – ३ ते २५ नोव्हेंबर
  • तक्रारींची अंतिम मुदत – ७ नोव्हेंबर
💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे नवीन वाटप कसे असणार आहे?

    Ans: नवीन नियमांनुसार TAIT परीक्षेतील गुण, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसाठी ९० गुण आणि संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण असणार आहेत.

  • Que: मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी कधी पार पडणार आहे?

    Ans: ही प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • Que: निवड प्रक्रियेबाबत तक्रार नोंदवण्यासाठी अंतिम मुदत कोणती आहे?

    Ans: उमेदवार आपल्या तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.

Web Title: Pavitra portal teacher recruitment interview schedule merit list marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • education
  • Pavitra Portal
  • Teacher

संबंधित बातम्या

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू
1

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
2

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
3

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
4

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.