Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

UNESCO Report 2026: यूनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट २०२६ नुसार ९५% उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठायला २१०५ उजाडणार असल्याची शक्यता आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 31, 2026 | 04:35 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ९५% मुलांना उच्च माध्यमिक शिक्षण मिळण्यासाठी लागतील आणखी ८० वर्ष
  • कमी उत्पन्न असणाऱ्या देशांची बिकट परिस्थिती
  • आर्थिक संकट आणि बजेटमधील कपात
UNESCO Report 2026: यूनेस्कोच्या ग्लोेबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट २०२६ मध्ये शिक्षणासंबंधी अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. या अहवलानुसार जर शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा आणि प्रगतीचा वेग असाच चालू राहिला तर जगातील ९५ टक्के तरुणांपर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी २१०५ येईल. याचा अर्थ सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी एका शतकाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल.

शिक्षणापूर्तीची सद्यस्थिती:

या अहवालानुसार, प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जागतिक दर सन २००० मधील ७७ टक्क्यांवरून वाढून २०२४ मध्ये ८८ टक्क्यांवर पोहोचली आहे. माध्यमिक शिक्षणाचा हा दर ६० टक्क्यांवरून वाढून ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षणाचा स्तर ३७ टक्क्यांवरून सुधारून ६१ टक्क्यांवर आला आहे. असे असले तरी, जगातील दर १० पैकी जवळपास ४ तरुण उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण न करताच शाळा सोडतात.

JEE Main 2027: जेईई मेन फॉर्ममध्ये चूक झाली आहे का? आता एनटीएने दिली नवीन फॉर्म भरण्याची मुभा!

शाळाबाहेर असणारे मुले आणि इतर समस्या:

२०२४ च्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे २७ कोटी ३० लाख मुले आणि तरुण शाळाबाह्य आहेत. ही संख्या शाळेच्या वयातील दर ६ पैकी १ मुलाएवढी आहे. लोकसंख्या वाढ, जागतिक संघर्ष आणि शिक्षण बजेटमध्ये झालेली कपात यांमुळे सलग सातव्या वर्षी शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच मुले उशिरा शाळेत प्रवेश घेणे आणि एकाच वर्गात वारंवार नापास होऊन थांबणे यांमुळे ते वयाच्या मानाने खूप मागे पडतात.

कमी उत्पन्न असणाऱ्या देशांची बिकट परिस्थिती:

गरीब देशांमध्ये सर्वात श्रीमंत कुटुंबांमधील १०० तरुणांच्या तुलनेत केवळ १३ गरीब तरुण उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. तर ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेत शिक्षणाची स्थिती अत्यंत नाजूक आहे.

Trainee IPS Officers: इतिहासात पहिल्यांदाच! कॅडर मिळण्यापूर्वी ट्रेनी IPS अधिकारी थेट गृह मंत्रालयाशी केले जोडले जाणार

आर्थिक संकट आणि बजेटमधील कपात:

२०२४ मध्ये शिक्षणावर होणारा सार्वजनिक खर्च जीडीपीच्या केवळ ४.२ प्रतिशत आणि एकूण सार्वजनिक खर्चाच्या १२.६ प्रतिशत इतकाच होता. १८३ देशांपैकी केवळ ४१ देश आंतरराष्ट्रीय शिक्षण बजेटचे मानक पूर्ण करू शकले. २०२३ ते २०२४ दरम्यान जागतिक स्तरावर मिळणाऱ्या शैक्षणिक मदतीत ८ टक्क्यांची घट झाली आहे, तर मूलभूत शिक्षणाला मिळणाऱ्या मदतीत तब्बल १६ टक्क्यांची मोठी कपात नोंदवली गेली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जगातील ९५ टक्के तरुणांपर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी किती वर्ष लागतील?

    Ans: शिक्षणातील सुधारणांचा वेग असाच राहिल्यास हे लक्ष्य गाठण्यासाठी वर्ष २१०५ उजाडण्याची शक्यता यूनेस्कोच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

  • Que: २०२४ च्या आकडेवारीनुसार जगभरात किती मुले शाळाबाह्य आहेत?

    Ans: २०२४ च्या आकडेवारीनुसार जगभरात सुमारे २७ कोटी ३० लाख मुले आणि तरुण शाळाबाह्य आहेत (जे शाळेच्या वयातील दर ६ पैकी १ मुलानुरुप आहे).

  • Que: शिक्षणावर होणारा सार्वजनिक खर्च जीडीपीच्या किती टक्के होता?

    Ans: २०२४ मध्ये शिक्षणावर होणारा सार्वजनिक खर्च हा जीडीपीच्या केवळ ४.२ टक्के आणि एकूण सार्वजनिक खर्चाच्या १२.६ टक्के इतका होता.

Web Title: Unesco report 2026 global education monitoring marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Alert Schools
  • education
  • Marathi News

संबंधित बातम्या

Trainee IPS Officers: इतिहासात पहिल्यांदाच! कॅडर मिळण्यापूर्वी ट्रेनी IPS अधिकारी थेट गृह मंत्रालयाशी केले जोडले जाणार
1

Trainee IPS Officers: इतिहासात पहिल्यांदाच! कॅडर मिळण्यापूर्वी ट्रेनी IPS अधिकारी थेट गृह मंत्रालयाशी केले जोडले जाणार

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
2

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू

JEE Main 2027: जेईई मेन फॉर्ममध्ये चूक झाली आहे का? आता एनटीएने दिली नवीन फॉर्म भरण्याची मुभा!
3

JEE Main 2027: जेईई मेन फॉर्ममध्ये चूक झाली आहे का? आता एनटीएने दिली नवीन फॉर्म भरण्याची मुभा!

Beed drought situation: गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ!
4

Beed drought situation: गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.