Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर

PGI Report 2025-26:केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) २.० अहवाल जाहीर केला आहे. देशात शिक्षकांची संख्या १.०३ कोटींवर पोहोचली असली, तरी १ लाख शाळा अजूनही एकल-शिक्षक आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 08, 2026 | 01:15 PM
school report

school report

Follow Us
Follow Us:

PGI Report 2025-26: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) २.० आणि परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स (PGI-D) २०२५-२६ चा अहवाल जाहीर करताना ही माहिती दिली आहे की, देशात सध्या एक कोटीहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या आकड्यामुळे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला असून भारतात पहिल्यांदाच शिक्षकांची संख्या सुमारे १.०३ कोटी पेक्षा जास्त झाली आहे. मात्र, याच वेळी जाहीर झालेल्या दुसऱ्या एका अहवालातून असे समोर आले आहे की, देशात अजूनही अनेक शाळा अशा आहेत ज्या केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर चालत आहेत. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार, देशभरात १,००,८४३ शाळा एकल-शिक्षक (Single Teacher) आहेत.

तसेच या अहवालानुसार, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरात झालेली घट ही गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय आहे. सरकारी अहवालानुसार, तिसरी ते पाचवीच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट दर २.३ टक्क्यांवरून घसरून १.८ टक्के झाला आहे. तर, नववी आणि दहावीच्या दरम्यान हा दर ८.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आला आहे.

‘एकल-शिक्षक’ शाळांमध्ये कोणते राज्य आघाडीवर?

अहवालानुसार, भारतात अशा सुमारे १,००,८४३ शाळा आहेत जिथे फक्त एकच शिक्षक आहे. या यादीत आंध्र प्रदेश अव्वल स्थानी असून, तिथे १६,३५७ एकल-शिक्षक शाळा आहेत. या यादीत झारखंड दुसऱ्या क्रमांकावर असून तिथल्या ९,८२७ शाळा केवळ एका शिक्षकाद्वारे चालवल्या जात आहेत. तर, पंजाबमध्ये अशा १,७४९ शाळा आहेत जिथे मुलांना शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक उपलब्ध आहे.

Success Story: ‘AI’ च्या युगात पदवी निरुपयोगी? छोटेखानी शहरातून आलेल्या उद्योगपतीने सोशल मीडियावर मांडलं यशाचं खरं गणित!

‘शून्य विद्यार्थी’ असलेल्या शाळा किती?

अहवालातील एका धक्कादायक माहितीनुसार, देशात एकही विद्यार्थी नसलेल्या (शून्य पटसंख्या असलेल्या) शाळांची संख्या ५,६६३ इतकी आहे. या शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला नाही, म्हणूनच त्यांना ‘शून्य नामांकन’ (Zero Enrolment) शाळा म्हणून ओळखले जाते. यामध्ये एकट्या पश्चिम बंगालमधील ४,१३३ शाळांचा समावेश आहे जिथे एकही ॲडमिशन झालेले नाही. विशेष म्हणजे, पंजाबमध्ये अशा १९ शाळा आहेत जिथे एकही विद्यार्थी नव्हता, पण तिथे तब्बल ५३ शिक्षक होते.

NEET-UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..

‘या’ राज्यांमध्ये एकही शून्य-नामांकन शाळा नाही

एकीकडे देशात विद्यार्थी नसलेल्या शाळा समोर आल्या असताना, दुसरीकडे देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथे एकही शाळा शून्य-नामांकन असलेली नाही. यामध्ये गोवा, चंदीगड, दिल्ली, दमण आणि दीव, लक्षद्वीप, पुडुचेरी तसेच हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. या ठिकाणी एकही शाळा शून्य विद्यार्थी संख्या असलेली नाही.

Web Title: Performance grading index pgi report teachers count single teacher schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Alert Schools
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
1

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!
2

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?
3

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
4

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.