Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Rashtriya Bal Puraskar 2026: ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’द्वारे आता ‘या’ मुलांना मिळणार राष्ट्रीय ओळख!

PM Rashtriya Bal Puraskar 2026: केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ६ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ ते १८ वयोगटातील बालकांना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 28, 2026 | 11:53 AM
bal puraskar

bal puraskar

Follow Us
Follow Us:

PM Rashtriya Bal Puraskar 2026: प्रत्येक मुलामध्ये कोणती ना कोणती खास प्रतिभा असते. कोणी विज्ञानात अद्भूत कामगिरी करते, कोणी खेळात देशाचे नाव उज्ज्वल करते, तर कोणी समाजसेवा, पर्यावरण संवर्धन किंवा कला-संस्कृतीच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडते. अशाच हुशार आणि गुणी मुलांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण अर्ज करू शकते, कोणत्या क्षेत्रांत पुरस्कार मिळणार आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे…

भारत सरकारचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देशातील अशा मुलांना दिला जातो, ज्यांनी कमी वयात विलक्षण किंवा असाधारण यश संपादन केले आहे. या सन्मानासाठी ५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व पात्र मुले अर्ज करू शकतात. हे नामांकन कोणत्याही व्यक्ती, शाळा, संस्था, शिक्षक, पालक किंवा संघटनेद्वारे केले जाऊ शकते. याशिवाय मुले स्वतःही आपला अर्ज सादर करू शकतात. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो आणि मुलांसाठी देशातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांमध्ये याची गणना होते.

कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळणार पुरस्कार?

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ हा एकूण सहा प्रमुख श्रेणींमध्ये दिला जाईल. या श्रेणीमध्ये शौर्य,समाजसेवा,पर्यावरण संवर्धन,क्रीडा,कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. अर्ज करताना आपल्या कामगिरीचे जास्तीत जास्त १००० शब्दांत वर्णन करावे लागेल. तसेच, या कामगिरीशी संबंधित पुरावे, आवश्यक कागदपत्रे आणि अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल.

DRDO Recruitment 2026: १० वी, डिप्लोमा आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी! DRDO मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर..

अर्ज कसा करावा?

१. सर्वात आधी उमेदवाराला पोर्टलवर जाऊन लॉगइन करावे लागेल.
२. यानंतर नाव, जन्मतारीख, शासकीय ओळखपत्र क्रमांक (Omitted), मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल.
३. त्यानंतर ‘Ongoing Nominations’ या सेक्शनमध्ये जाऊन ‘Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2026’ ची निवड करावी लागेल.
४. यानंतर ‘Nominate/Apply Now’ वर क्लिक करून संबंधित पुरस्काराची श्रेणी निवडावी लागेल आणि हा अर्ज स्वतःसाठी आहे की इतर दुसऱ्या मुलासाठी, हे नमूद करावे लागेल.
५. अर्ज फॉर्ममध्ये कामगिरीचा सविस्तर तपशील, आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करता येईल.

B.Pharm Scholarship: बी.फार्मचे शिक्षण घ्यायचे आहे? मग केंद्र सरकारच्या ‘या’ टॉप ५ शिष्यवृत्ती योजना लगेचच जाणून घ्या

अंतिम तारीख कधी आहे?

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचा नवीन अर्ज स्वीकारला जाणार नाही. तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही पात्र मुलाची संधी हुकू नये, यासाठी वेळेत अर्ज पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Pradhan mantri rashtriya bal puraskar 2026 online registration last date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • child
  • National Awards
  • Student

संबंधित बातम्या

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
2

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
3

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.