फोटो सौजन्य- सोशल मीडिया
DRDO Recruitment 2026:सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ‘डीआरडीओ’ (DRDO) च्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स अॅप्लिकेशन्स लॅबोरेटरी (DEAL) ने अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
या भरतीमध्ये पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी (Engineering) आणि तांत्रिक क्षेत्राशी जोडलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. याव्यतिरिक्त, पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखेतील इंजिनिअरिंगची पदवी म्हणजेच बी.ई. (BE) किंवा बी.टेक. (B.Tech) असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला किमान ६०% गुण असणे बंधनकारक आहे. तसेच, काही पदांसाठी लायब्ररी सायन्सची पात्रता असणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. डिप्लोमा धारक उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या विषयांतून अर्ज करू शकतात. तर, आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कोपा आणि इतर तांत्रिक ट्रेड्समधून अर्ज करण्यास पात्र असतील.
पदवीधर (Graduate) उमेदवार: १२,३०० रुपये प्रतिमहिना
डिप्लोमा (Diploma) उमेदवार: १०,९०० रुपये प्रतिमहिना
आयटीआय (ITI) अप्रेंटिस: १०,५६० रुपये प्रतिमहिना
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक रेकॉर्ड, मुलाखत (Interview) किंवा निश्चित केलेल्या प्रक्रियेच्या आधारे केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये केवळ तेच उमेदवार भाग घेऊ शकतात. ज्यांनी वर्ष २०२२ ते २०२६ दरम्यान आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर (Graduate) आणि डिप्लोमा धारक उमेदवारांना NATS 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तर आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार NAPS पोर्टलवर जाऊन ३० जून २०२६ पासून अर्ज भरू शकतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी.






