
Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण
ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास हडपसरमधील अमर कोर्टयार्ड सोसायटीत घडली. यावेळी हेमंत दामोदर गाढवे यांचा ११ वर्षांचा मुलगा समरजित हा सोसायटीच्या मागील बाजूला असलेल्या उद्यानात सायकल घेऊन जात होता. त्याच वेळी सोसायटीच्या बेसमेंटमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला, ज्यामुळे तो सायकलसह बाजूला थांबला. मात्र, काही क्षणातच पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घालून छातीला चावा घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने मुलगा प्रचंड घाबरला आणि जखमी झाला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पाळीव कुत्र्याला सुरक्षितपणे बांधून न ठेवल्यामुळे आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे कुत्र्याच्या मालक मिनल महावीर माने (रा. अमर कोर्टयार्ड, हडपसर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
Ans: ही घटना पुण्याच्या हडपसरमधील अमर कोर्टयार्ड सोसायटीच्या आवारात घडली आहे.
Ans: ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सोसायटीच्या उद्यानात सायकल चालवणाऱ्या ११ वर्षीय समरजित गाढवे याच्यावर हा हल्ला झाला.
Ans: पोलिसांनी कुत्र्याला सुरक्षितपणे न बांधल्यामुळे कुत्र्याच्या मालक मिनल महावीर माने यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.