Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women in Police Force: देशात सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्यात? जाणून घ्या एका क्लिकवर…

Women in Police Force: IPS प्रीता वर्मा यांच्याकडे बिहारच्या DGP पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला पोलीस आहेत? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 03:39 PM
police

police

Follow Us
Follow Us:

Women in Police Force: बिहार पोलीस दलात सध्या महिला प्रतिनिधित्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. १९९१ च्या बॅचच्या IPS अधिकारी प्रीता वर्मा यांच्याकडे बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) विनय कुमार यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या DGP पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रीता वर्मा यांच्याकडे १५ सप्टेंबर २०२६ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी हा कार्यभार देण्यात आला आहे. विनय कुमार यांनी दीर्घ रजेचा अर्ज दिला होता, ज्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. ते रजेवरून परतल्यानंतर हा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात येईल.

प्रीता वर्मा सध्या बिहारच्या ‘डीजी होमगार्ड आणि अग्निशमन सेवा’ या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रीता वर्मा यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर पुन्हा एकदा देशातील विविध राज्यांमधील महिला पोलिसांच्या सहभागावर चर्चा रंगू लागली आहे. अशा परिस्थितीत, देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला पोलीस आहेत आणि त्यांची संख्या किती आहे, ते जाणून घेऊया.

‘या’ राज्यात आहेत सर्वाधिक महिला पोलीस कर्मचारी

बिहारमध्ये सध्या सुमारे ३०,००० महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’च्या १ जानेवारी २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार, बिहार पोलीस दलात महिलांचा सहभाग २५.३०% आहे, जो संपूर्ण देशातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. बिहारनंतर हिमाचल प्रदेशमध्ये १९.१५% आणि चंदीगडमध्ये १८.७८% महिला पोलीस आहेत. लोकसभा आकडेवारीनुसार, केवळ संख्येचा विचार केल्यास देशात सर्वाधिक महिला पोलीस कर्मचारी उत्तर प्रदेशात आहेत. तज्ज्ञांच्या मते, उत्तर प्रदेशातील प्रचंड लोकसंख्येमुळे ही संख्या जास्त आहे. बिहारमध्ये महिलांचा पोलिसांमधील सहभाग वाढवण्यात आरक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०१३ मध्ये पोलिसांत महिलांसाठी ३५% आरक्षण लागू केले होते, ज्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठा बदल झाला.

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

देशभरातील पोलीस दलातील महिलांची स्थिती

‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५’ नुसार देशभरातील पोलीस दलात सुमारे २.४ लाख महिला कार्यरत आहेत. मात्र यामध्ये केवळ ९६० महिला आयपीएस (IPS) दर्जाच्या तर २४,३२२ महिला इतर अधिकारी पदांवर आहेत. सुमारे २.१७ लाख महिला कॉन्स्टेबल स्तरावर कार्यरत आहेत. पोलीस दलात काम करणाऱ्या एकूण महिलांपैकी सुमारे ९०% महिला या कॉन्स्टेबुलरी (शिपाई) स्तरावर आहेत.

अहवालानुसार, कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने पोलिसांमधील महिला प्रतिनिधित्वाचे आपले निश्चित दिलेले लक्ष्य अद्याप पूर्ण केलेले नाही. मात्र, देशभरातील सुमारे ७८% पोलीस ठाण्यांमध्ये आता ‘महिला हेल्प डेस्क’ उपलब्ध आहेत.

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…

प्रीता वर्मा यांना मिळाला आहे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

बिहारच्या प्रभारी DGP प्रीता वर्मा या बिहार कॅडरच्या १९९१ बॅचच्या IPS अधिकारी असून त्यांच्याकडे तीन दशकांहून अधिक काळ पोलीस सेवेचा अनुभव आहे. २००९ मध्ये त्यांना ‘पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (President’s Police Medal for Distinguished Service) देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी पोलीस सेवेत अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. २०२३ च्या IPS नागरी यादीत त्यांची नोंद बिहारच्या ‘DG’ पदावर होती. २०२६ मध्ये त्यांच्याकडे ‘DG होमगार्ड आणि अग्निशमन सेवा’ ही जबाबदारी देण्यात आली आणि आता त्या बिहारच्या प्रभारी DGP म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Preeta verma bihar dgp charge most women in police force statewise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Action on Police
  • government jobs

संबंधित बातम्या

Trainee IPS Officers: इतिहासात पहिल्यांदाच! कॅडर मिळण्यापूर्वी ट्रेनी IPS अधिकारी थेट गृह मंत्रालयाशी केले जोडले जाणार
1

Trainee IPS Officers: इतिहासात पहिल्यांदाच! कॅडर मिळण्यापूर्वी ट्रेनी IPS अधिकारी थेट गृह मंत्रालयाशी केले जोडले जाणार

भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! Air Marshal Vikram Gaur यांची ‘अतिरिक्त सचिवपदी’ नियुक्ती
2

भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! Air Marshal Vikram Gaur यांची ‘अतिरिक्त सचिवपदी’ नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.