लिंक्डिंनच्या ओपन टू वर्कमध्ये आता अपडेशन (फोटो सौजन्य - iStock)
लिंक्डइनच्या (LinkedIn) ‘ओपन टू वर्क’ वैशिष्ट्याने दीर्घकाळापासून प्रोफेशनल्सना त्यांच्या पुढील संधीसाठी ते कधी सज्ज असतील हे ओळखण्यास मदत केली आहे. जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्मवरील ‘ओपन टू वर्क’ वैशिष्ट्याचा वापर करणारे ८५ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, त्यांना त्यांच्या कनेक्शन्सकडून मदत किंवा प्रोत्साहन मिळाले आहे. यामधून प्रेरणा घेत लिंक्डइन अपडेट्स सादर करत आहे, जे सदस्यांना त्यांच्या रोजगार शोधामध्ये अधिक नियंत्रण व पारदर्शकता देतात.
‘ओपन टू वर्क’ वैशिष्ट्याचा वापर करताना सदस्य आता ते नवीन नोकरीवर सामील होण्यास कधी उपलब्ध आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा नोटीस कालावधी आणि कामाच्या मोबदल्यासंदर्भात अपेक्षित वार्षिक वेतन समाविष्ट करू शकतात. ही पर्यायी क्षेत्रे प्रोफेशनल्सना सुरूवातीपासून स्पष्टता देतात, ज्यामुळे विसंगत संवाद टाळण्यास मदत होते. सदस्याचा ‘ओपन टू वर्क’ बॅज सार्वजनिक स्तरावर दृश्यमान असला तरी ही माहिती फक्त रिक्रूटर्सना दिसते.
आता सहज मिळवा तुमची आवडती नोकरी, Linkedin वर AI झटपट बनवेल तुमचा Resume, कसं ते जाणून घ्या…
सिग्नल्समुळे मिळेल मदत
लिंक्डइन इंडियाच्या टॅलेंट अँड लर्निंग सोल्यूशन्सच्या प्रमुख रूची आनंद म्हणाल्या की, वाहतूकीच्या सिग्नलप्रमाणे प्रोफेशनल्सनी पाठवलेले लाल, पिवळा व हिरवा सिग्नल्स त्यांच्या करिअरला पुढे घेऊन जाण्यामध्ये फरक घडवून आणू शकतात. कसे ते पुढीलप्रमाणे:
LinkedIn चा मोठा निर्णय; आता तुमचा डेटा AI ट्रेनिंग आणि जाहिरातींसाठी वापरणार
रिक्रूटर्सना कशाप्रकारे योग्य सिग्नल्स पाठवावे