(फोटो सौजन्य - LinkedIn)
नोकरी, व्यवयाय, कर्मचारी यांच्यामध्ये सध्या वेगाने बदल होत आहेत. नोकरी शोधण्यासाठी तुम्ही अनेक वेबसाईट आणि अॅपचा वापर करता. यामधील एक अॅप म्हणजे LinkedIn. LinkedIn चा वापर नोकरी शोधण्यासाठी केला जातो. एखादी नोकरीची संधी असेल तर आपण लगेच तिथे आपला Resume पाठवितो. पण हा Resume तयार करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. पण LinkedIn च्या या नव्या फीचरमुळे तुम्हाला अगदी सहज तुमचा Resume तयार करता येणार आहे. Resume तयार करण्यासाठी LinkedIn ने एक नवे AI फीचर लाँच केले आहे. त्यामुळे आता LinkedIn च्या या नव्या फिचरव्दारे Resume तयार करणे, नोकरी शोधणे आणि जगभरातील लोकांशी कनेक्ट करणे अगदी सहज सोपे होणार आहे.
LinkedIn चे नवे AI फीचर जगभरातील प्रीमियम ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. २०३० पर्यंत व्यावसायिक क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी LinkedIn चे नवे AI फीचर नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या AI फीचरमध्ये एक Jobseeker Coach असणार आहे. Jobseeker Coach वापरकर्त्यांना योग्य नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे. या नव्या फीचरमध्ये एक Chatbot देखील असणार आहे. हा Chatbot तुम्हाला कव्हर लेटर तयार करण्यासाठी मदत करेल. तसेच या फीचरमध्ये Review Tool देखील आहे. LinkedIn चे नवे AI फीचर कर्मचारी आणि व्यावसायिक दोघांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. LinkedIn च्या AI फीचरमुळे नोकरी शोधणे आणि Resume तयार करणे अगदी सहज सोपे होणार आहे.
LinkedIn च्या AI फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी तुमचा जुना Resume अपलोड करावा लागेल. यानंतर AI फीचर तुमचा Resume तपासून त्यानुसार तुम्हाला सल्ला देईल. या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या Resume मध्ये बदल करू शकता. AI फीचर च्या मदतीने तयार केलेला Resume अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या Resume मुळे तुम्हाला नोकरी शोधणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांच्या वेळेत देखील बचत होणार आहे. LinkedIn चे हे AI फीचर सध्या केवळ जगभरातील प्रीमियम ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. LinkedIn ने आतापर्यंत नोकरी शोधण्याऱ्यांसाठी अनेक नवीन फीचर लाँच केले आहेत. या सर्व फीचर्सना वापरकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे नवे फीचर देखील वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.