मुंबई: जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असलेल्या लिंक्डइनने (LinkedIn) आपल्या गोपनीयता धोरणामध्ये (Privacy Policy) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ३ नोव्हेंबरपासून मायक्रोसॉफ्टला (Microsoft) वापरकर्त्यांचा डेटा वापरण्याची परवानगी असेल. या डेटाचा वापर केवळ एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठीच नाही, तर वैयक्तिकृत जाहिरातींसाठीही केला जाणार आहे.
लिंक्डइननुसार, वापरकर्त्यांचे प्रोफाइल, कामाचा अनुभव, शैक्षणिक तपशील, पोस्ट आणि कमेंट्स यांसारख्या माहितीवर प्रक्रिया केली जाईल. मात्र, कंपनीने स्पष्ट केले आहे की, खासगी संदेश (Private Messages) पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि कोणत्याही परिस्थितीत शेअर केले जाणार नाहीत.
लिंक्डइनने वापरकर्त्यांना ‘ऑप्ट-आउट’ (Opt-Out) चा पर्याय दिला आहे. याचा अर्थ, तुम्हाला तुमचा डेटा एआय ट्रेनिंग किंवा जाहिरातींसाठी वापरला जाऊ नये असे वाटत असल्यास, तुम्ही ही सुविधा बंद करू शकता. परंतु, लक्षात ठेवा, ३ नोव्हेंबरपूर्वी शेअर केलेला डेटा तुम्ही ऑप्ट-आउट करेपर्यंत वापरला जात राहील.
एआय ट्रेनिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग:
जाहिरातींसाठी डेटा शेअरिंग थांबवण्याचा मार्ग:
हे बदल फक्त युरोपियन युनियन (EU), ईईए (EEA), यूके (UK), स्वित्झर्लंड, कॅनडा आणि हाँगकाँगमध्ये लागू होतील. तर, अमेरिका आणि इतर देशांमध्ये मायक्रोसॉफ्टसोबत केवळ जाहिरात डेटा शेअरिंगचा बदल लागू होईल. EU आणि यूकेसारख्या देशांमधील कठोर गोपनीयता कायद्यांमुळे तेथे जाहिरातींसाठी डेटा शेअरिंगला परवानगी दिली जाणार नाही.