Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक

Pune MPSC student protest 2026 : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेतला. या मोर्चामध्ये पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 07, 2026 | 12:10 PM
mpsc morcha

mpsc morcha

Follow Us
Follow Us:

Pune MPSC student protest 2026 : पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा अत्यंत आक्रमक रूप धारण करून रस्त्यावर उतरला आहे. ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चामध्ये हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहभागी झाले असून, संपूर्ण परिसरात सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता राजकीय नेत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत असून, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या भूमिकेला बळ दिले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी काळा शर्ट परिधान करत थेट सरकार आणि MPSC अध्यक्षांचा तीव्र निषेध नोंदवला. “पैसे खाण्याच्या नादात गरीब आणि होतकरू मुलांच्या भविष्याशी खेळले जात आहे. वीस-वीस तास अभ्यास करणारे विद्यार्थी मेहनत करत असताना, ५० ते ६० लाख रुपये देऊन इतर व्यक्ती अधिकारी होत असतील, तर हे महाराष्ट्राला मान्य नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

आमदार रोहित पवारांची भूमिका

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी MPSC चा अध्यक्ष आणि सचिव बदलण्याची जोरदार मागणी केली असून, प्रशासनात स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, MPSC च्या उत्पादन शुल्क परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक प्रकरणात चक्क आयोगाचाच सहसचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याचे समोर आले आहे, जी अत्यंत धक्कादायक बाब आहे. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि दुसरीकडे आयोगानेच पेपर विकायचे, हा प्रकार बिलकूल खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Engineering recruitment 2026 : संरक्षण मंत्रालयांतर्गत नोकरीची संधी! प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा!

आंदोलनाला पोलिसांचा बंदोबस्त

वाढत्या आंदोलनामुळे संबंधित परिसरात मोठी गर्दी जमली असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणांवर आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आता राज्य सरकार नेमकी काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Pune mpsc student protest aakrosh morcha 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • Student Protest

संबंधित बातम्या

MPSC paper leak घोटाळा; २७० पानांच्या व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ९१ प्रश्नांचे गूढ!
1

MPSC paper leak घोटाळा; २७० पानांच्या व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ९१ प्रश्नांचे गूढ!

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक
2

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
3

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी
4

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.