Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

QS World University Rankings 2027: भारतातील विद्यापीठांचा आशियात डंका; जाणून घ्या देशातील टॉप १० संस्थांची यादी

QS World University Rankings 2027: 'क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७' मध्ये भारतातील तब्बल ३२५ विद्यापीठांचा समावेश झाला असून, भारत हा चीननंतर आशियातील दुसरा मोठा शिक्षण केंद्र बनला आहे. मात्र, IIT दिल्लीसह देशातील अव्वल ६ संस्थांची आशियाई स्तरावरील रँकिंग काही अंशी घसरली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 04, 2026 | 11:38 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • क्यूएस आशिया रँकिंग २०२७ मधील भारतातील ‘टॉप १०’ संस्था
  • IIT दिल्ली अव्वल स्थानी कायम
  • भारतीय विद्यापीठे मागे का पडत आहेत?
QS World University Rankings 2027:  वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७ ची यादी जाहीर झाली आहे. यंदा आशियातील युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताने आपले प्रतिनिधित्व वाढवले आहे. परंतु, देशातील प्रमुख संस्थांना प्रादेशिक स्पर्धकांशी बरोबरी साधताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग: आशिया २०२७’ मध्ये भारतातील एकूण ३२५ विद्यापीठांचा समावेश झाला असून, यात ३४ नवीन विद्यापीठांनी प्रवेश केला आहे. यासह भारत हा चीननंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उच्च शिक्षण प्रणाली असलेला देश बनला आहे. क्यूएसच्या माहितीनुसार, या रँकिंगमध्ये २६ उच्च शिक्षण प्रणालींमधील तब्बल १,७२२ विद्यापीठांचा समावेश आहे. मात्र, भारताचे प्रतिनिधित्व वाढले असले तरी, यावेळच्या यादीत भारतातील अव्वल ६ उच्च संस्थांची रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.

IIT दिल्ली अव्वल स्थानी कायम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली ही भारतातील सर्वात अव्वल मानांकन असलेली संस्था म्हणून आपले स्थान टिकवून आहे. मात्र, आशियाई स्तरावर ती ५९ व्या स्थानावरून ६६ व्या स्थानावर खाली आली आहे. दुसरीकडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरू ७९ व्या क्रमांकासह भारतीय संस्थांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर IIT बॉम्बे ८३ व्या, तर IIT मद्रास ८५ व्या स्थानावर आहे. IIT खरगपूर ९० व्या आणि IIT कानपूर ९७ व्या स्थानावर फेकले गेले आहे. गेल्या आवृत्तीच्या तुलनेत या सर्व ६ प्रमुख संस्थांच्या रँकिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

याशिवाय, दिल्ली युनिव्हर्सिटी (DU) आशियातील टॉप १०० च्या यादीतून बाहेर पडली असून ती ९५ व्या स्थानावरून १०६ व्या क्रमांकावर खाली आली आहे. दुसरीकडे, चंदीगड युनिव्हर्सिटीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून ती १०९ व्या स्थानावरून १०४ व्या स्थानावर पोहोचली आहे, तर लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) १८७ व्या स्थानावरून १५४ व्या स्थानावर आली आहे.

क्यूएस आशिया रँकिंग २०२७ मधील भारतातील ‘टॉप १०’ संस्था:

इंडियन इन्स्टिट्यूट आशिया रँकिंग
IIT दिल्ली ६६
IISc बंगळुरू ७९
IIT बॉम्बे ८३
IIT मद्रास ८५
IIT खरगपूर ९०
IIT कानपूर ९७
चंदीगड युनिव्हर्सिटी १०४
दिल्ली युनिव्हर्सिटी १०६
IIT गुवाहाटी १२०
IIT रुडकी १२४

कोणती युनिव्हर्सिटी राहिली अव्वल स्थानी?

क्यूएस रँकिंगमध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ने सलग दुसऱ्या वर्षी पहिले स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ ‘पेकिंग युनिव्हर्सिटी’ दुसऱ्या स्थानावर आहे. ‘शिंगुआ युनिव्हर्सिटी’ नवव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर आल्यामुळे टॉप ३ मध्ये चीनच्या दोन संस्थांचा समावेश झाला आहे. तसेच ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ आणि ‘द चायनिज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सिंगापूरची ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’ आणि ‘नान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आल्या आहेत.

RITES Recruitment 2026: रेल्वे मंत्रालयांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘राईट्स’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

भारतीय विद्यापीठे मागे का पडत आहेत?

या रँकिंगमध्ये भारतीय विद्यापीठांच्या रँकिंग घसरण्यामागे आशियातील वाढती तीव्र स्पर्धा हे मुख्य कारण मानले जात आहे. यंदाच्या रँकिंगमध्ये १९५ नवीन विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. तसेच आधीपासून असलेल्या अनेक विद्यापीठांनी यंदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या रँकिंगमध्ये शैक्षणिक प्रतिष्ठा या निकषावर ७६ टक्के आणि एम्प्लॉयर रेप्युटेशन या निकषावर ८३ टक्के भारतीय विद्यापीठांची कामगिरी कमकुवत झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्टुडंट एक्सचेंजशी संबंधित निकषांवरही भारतीय संस्थांचे नुकसान झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७' मध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे?

    Ans: या रँकिंगमध्ये भारतातील ३२५ विद्यापीठांचा समावेश झाला असून, यंदा ३४ नवीन विद्यापीठांनी या यादीत प्रवेश केला आहे.

  • Que: या रँकिंगनुसार भारतातील सर्वात अव्वल संस्था कोणती ठरली आहे?

    Ans: IIT दिल्ली ही आशियात ६६ व्या स्थानासह भारतातील सर्वात अव्वल मानांकन असलेली संस्था ठरली आहे.

  • Que: आशिया खंडात कोणती युनिव्हर्सिटी पहिल्या क्रमांकावर आहे?

    Ans: 'युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग' (University of Hong Kong) ने सलग दुसऱ्या वर्षी आशिया खंडात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Web Title: Qs world university rankings 2027 iit delhi top in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • education
  • Marathi News
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन
1

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन

Binance Cyber Attack : बनावट नोकरीच्या मुलाखतीतून ६.३ अब्ज डॉलरची क्रिप्टो चोरी; AI टूलचा वापर करून हॅकर्सनी घातला घाव
2

Binance Cyber Attack : बनावट नोकरीच्या मुलाखतीतून ६.३ अब्ज डॉलरची क्रिप्टो चोरी; AI टूलचा वापर करून हॅकर्सनी घातला घाव

Maharashtra Health News : राज्याच्या आरोग्य सेवेला मिळणार मोठे बळ; १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश
3

Maharashtra Health News : राज्याच्या आरोग्य सेवेला मिळणार मोठे बळ; १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश

US-Israel News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! वर्षअखेरीनंतर इस्रायलला अमेरिकेकडून आर्थिक मदत बंद होणार
4

US-Israel News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! वर्षअखेरीनंतर इस्रायलला अमेरिकेकडून आर्थिक मदत बंद होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.