
फोटो सौजन्य AI
त्यामुळे पोलिसांनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तपास यंत्रणांचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
Pune Metro: ‘पुणे 2030 पर्यंत देशातील मोठे…’; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे नियंत्रणात चांगली कामगिरी केली आहे. डायल ११२ सेवेमुळे पोलिसांचा प्रतिसाद वेळ तीन मिनिटांपर्यंत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण आणि गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासातील मानवी मर्यादा कमी करता येत आहेत. ‘तपास सारथी’ या AI आधारित प्रणालीमुळे गुन्ह्याच्या तपासापासून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांची सुरक्षितता आणि तपासातील पारदर्शकताही वाढणार आहे.
देशातील तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे हे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. पुढील तीन ते चार वर्षांत देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी अंमली पदार्थांची निर्मिती रोखणे, वितरण साखळी मोडीत काढणे, जनजागृती करणे आणि व्यसनाधीन व्यक्तींना उपचार उपलब्ध करून देणे अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
पालकांनीही आपल्या मुलांमधील व्यसनाची लक्षणे ओळखून वेळेत समुपदेशन आणि उपचार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. घर, परिसर, गाव आणि जिल्हा पातळीवरून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
Pune Metro: ‘पुणे 2030 पर्यंत देशातील मोठे…’; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
पिंपरी-चिंचवडमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाची इमारत उभारण्यात येत असून, पोलीस मुख्यालयासाठी ५० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांसाठी आधुनिक सोयींनी युक्त निवासस्थानेही उभारण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना आवश्यक सुविधा आणि हक्काची घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चिखलीतील नवीन पोलीस आयुक्तालय, पिंपरी पोलीस संकुल, आळंदी पोलीस ठाणे, वाकड येथील अपर पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर कार्यालय आणि अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या मुख्यालयासह विविध प्रकल्पांची माहिती दिली. दिवंगत अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयासाठी १८० कोटी रुपये मंजूर केले होते. या प्रकल्पांमुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.