Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी-बारावीतील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार ३० हजारांचं रोख पारितोषिक

दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’अंतर्गत ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 25, 2025 | 08:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ही योजना राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय या तीन स्तरांवर राबविली जात आहे.

कॉलेजमध्ये दोनदा नापास, तरीही बनले IAS अधिकारी; अनुराग कुमार यांची प्रेरणादायी कहाणी, वाचलीत का?

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल, सैनिकी शाळा आणि नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. राज्य शिक्षण मंडळ व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या योजनेअंतर्गत दहावी आणि बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान) शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला-मुलींना सन्मानित केले जाणार आहे.

गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला राज्य स्तरावर ३० हजार, अपर आयुक्त स्तरावर १५ हजार आणि प्रकल्प कार्यालयात १० हजार रुपये मिळतील. द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ७ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये दिले जातील. चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ नसल्यामुळे वगळण्यात आले आहे.

साऊथ इंडियन बँक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया; शेवटची तारीख जवळ, लवकर करा अर्ज

मात्र, राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतील प्रत्येकी २४ गुणवंत विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील प्रथम क्रमांकाच्या तीन विद्यार्थ्यांना प्रकल्प व अपर आयुक्त स्तरावर गौरविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा तसेच त्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सुद्धा विशेष सत्कार केला जाणार आहे. ही योजना विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेबाबतची आवड निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Raghoji bhangare gungaurav yojana 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • ED
  • Tribal Community

संबंधित बातम्या

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
1

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.