Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

Ramayana Movie Cast Education: ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ४ हजार कोटींच्या 'रामायण' चित्रपटातील स्टार कास्ट अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल असून, माता सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी ही व्यावसायिक डॉक्टर आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 01:29 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Ramayana Movie Cast Education: नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘रामायण’ हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि भव्य चित्रपट आहे. याचा एकूण अर्थसंकल्प (बजेट) सुमारे ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘रामायण’ चित्रपट ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या मेगा-प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूरपासून ते साई पल्लवी, यश, सनी देओल आणि लारा दत्ता यांसारखे नामांकित कलाकार वेगवेगळ्या पौराणिक भूमिकांमध्ये दिसून येत आहेत.

पडद्यावर प्रभू श्री राम, रावण आणि माता सीतेची भूमिका साकारणारे हे कलाकार अभिनयात तर पटाईत आहेतच, पण तुम्हाला माहीत आहे का की यापैकी कोणता कलाकार सर्वात जास्त शिकलेला आहे? कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनिअरिंग केले आहे, तर कोणी परदेशातून मेथड ॲक्टिंगची पदवी घेऊन आले आहे. चला तर मग जाणून घेऊया ४ हजार कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटातील हे कलाकार रिअल लाईफमध्ये किती शिक्षित आहेत.

रणबीर कपूरचे शिक्षण :

रामायण चित्रपटात प्रभू श्री नामाची मुख्य भूमिका साकारणारा रणबीर कपूर आपल्या दमदार अभिनयासोबतच उत्कृष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीसाठीही ओळखला जातो. त्याने आपले प्राथमिक शालेय शिक्षण मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्याने प्रसिद्ध एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून प्री-युनिव्हर्सिटीचे शिक्षण घेतले.

अभ्यासाप्रती असलेल्या आपल्या सर्जनशील आवडीमुळे तो न्यू यॉर्कला गेला. तेथे त्याने ‘स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स’मधून फिल्ममेकिंग आणि मेथड ॲक्टिंगच्या बारकावे शिकले. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी त्याला १५० कोटी रुपयांचे प्रचंड मानधन मिळत आहे. एवढे शिक्षण घेणारा रणबीर त्याच्या घराण्यातील पहिला मुलगा आहे.

साई पल्लवीचे शिक्षण :

चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी अभिनयासोबतच एक व्यावसायिक डॉक्टरसुद्धा आहे. तिने आपले वैद्यकीय (मेडिकल) शिक्षण जॉर्जियाच्या त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आणि तेथून एमबीबीएसची (MBBS) पदवी प्राप्त केली. यानंतर तिने भारतात येऊन FMGE (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन) परीक्षादेखील उत्तीर्ण केली आहे. तिने इच्छिले असते तर फुल-टाईम वैद्यकीय करिअर निवडू शकली असती, परंतु तिने अभिनयाच्या विश्वाला आपला मार्ग निवडले.

अभिनेता यशचे शिक्षण :

कन्नड सिनेसृष्टीचा सुपरस्टार यश या चित्रपटात क्रूर आणि शक्तिशाली लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण म्हैसूरच्या महाजन हायस्कूलमधून झाले. त्यानंतर त्याने एसबीआरआर महाजन प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. यशबद्दलची एक रंजक गोष्ट म्हणजे त्याच्याकडे कोणत्याही मोठ्या विद्यापीठाची पदवी नाही. मात्र, स्वतःचे कष्ट आणि प्रभावी संवादफेकीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत जे स्थान निर्माण केले आहे, ते कोणत्याही मोठ्या पदवीपेक्षा कमी नाही.

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

रवी दुबेचे शिक्षण :

छोट्या पडद्यापासून ते ओटीटी आणि चित्रपटांपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे या चित्रपटात प्रभू रामाचे धाकटे भाऊ लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. शिक्षणाच्या बाबतीत तो तांत्रिक क्षेत्राशी जोडलेला राहिला आहे. रवी दुबेने मुंबईच्या प्रसिद्ध राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून टेलिकॉम इंजिनिअरिंग (B.Tech) चे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने मनोरंजनाच्या जगात पाऊल ठेवले आणि आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली.

लारा दत्ताचे शिक्षण :

रामायण चित्रपटात राजा दशरथांची पत्नी म्हणजेच माता कैकेयीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री लारा दत्ता हे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्तम मेळ आहे. तिने आपले शालेय शिक्षण बंगळुरूच्या सेंट फ्रान्सिस जेव्हियर गर्ल्स हायस्कूल आणि फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली, ज्यामध्ये कम्युनिकेशन हा तिचा मायनर विषय होता. सन २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणारी लारा अनेक भाषांमध्ये पारंगत आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर तिची पकड अत्यंत मजबूत आहे.

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

सनी देओलचे शिक्षण :

महाबली हनुमानाच्या भूमिकेत दिसणाऱ्या दिग्गज अभिनेता सनी देओलनेही उत्तम शिक्षण घेतले आहे. त्याने आपले प्राथमिक शालेय शिक्षण मुंबईच्या सेक्रेड हार्ट बॉईज हायस्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्याने मुंबईच्या प्रसिद्ध रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून कॉमर्स विषयात पदवी पूर्ण केली. याशिवाय, अभिनयाचे बारकावे शिकण्यासाठी तो इंग्लंडला गेला होता. तिथे त्याने बर्मिंघमच्या Old Rep थिएटरमधून थिएटर आणि स्टेज परफॉर्मन्सचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. यामुळेच त्याची इंग्रजी भाषा आणि स्क्रीन प्रेझेन्स नेहमीच अतिशय प्रभावी राहिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'रामायण' चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी किती शिकलेली आहे?

    Ans: साई पल्लवी ही एमबीबीएस (MBBS) पदवीधारक असून तिने जॉर्जियाच्या त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

  • Que: चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने कोठून शिक्षण घेतले आहे?

    Ans: रणबीर कपूरने मुंबईतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यू यॉर्कच्या 'स्कूूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स'मधून फिल्ममेकिंग आणि मेथड ॲक्टिंगचे शिक्षण घेतले आहे.

  • Que: 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेचे शिक्षण काय आहे?

    Ans: अभिनेता रवी दुबे हा तांत्रिक पार्श्वभूमीचा असून त्याने टेलीकॉम इंजिनिअरिंग (B.Tech) ची पदवी घेतली आहे.

Web Title: Ramayana movie cast education qualification ranbir sai pallavi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Actor
  • education
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम
1

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
2

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक
3

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर
4

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.