Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

JEE Main 2027 Registration: एनटीएने जेईई मेन २०२७ च्या जानेवारी सत्रासाठी परदेशी आणि एनआरआई विद्यार्थ्यांना पासपोर्टद्वारे अर्ज करण्याची परवानगी दिली असून, विनालेट फी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 12:57 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पासपोर्टचा उपयोग करता येणार
  • ओळख आणि री-केवाईसी अनिवार्य
  • चुका सुधारण्यासाठी नवीन अर्ज करण्याची मुभा
JEE Main 2027 Registration: इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२७ (JEE Main 2027) च्या जानेवारी सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान, एनटीएने (NTA) परदेशात राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थी आणि इतर उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या एनआरआई  किंवा इतर उमेदवारांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नाही, ते आता त्यांच्या पासपोर्टचा वापर ओळखीचा पुरावा म्हणून करून अर्ज पूर्ण करू शकतात. सोशल मीडियावर एका एनआरआई विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात एनटीएने स्पष्ट केले आहे की, आता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पासपोर्टचा उपयोग करता येईल. एजन्सीच्या या पाऊलामुळे ओळख दर्शवणाऱ्या कागदपत्रांच्या कमतरतेमुळे नोंदणीमध्ये अडचणींचा सामना करणाऱ्या परदेशी आणि भारतीय उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ओळख आणि री-केवाईसी अनिवार्य

एनटीएतर्फे जारी करण्यात आलेल्या अधिकृत निर्देशानुसार, जेईई मेन २०२७ च्या नोंदणीसाठी ‘मेरी पहचान’ पोर्टलच्या माध्यमातून लॉगिन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे उमेदवार तीन मुख्य प्लॅटफॉर्म्सपैकी- जसे की डिजिलॉकर (DigiLocker), ई-प्रमाण किंवा जन परिचय- एकाची निवड करून लॉगिन करू शकतात. एजन्सीने विद्यार्थ्यांना डिजिलॉकरच्या माध्यमातून री-केवाईसी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. अर्जामधील उमेदवाराचे नाव आणि जन्मतारीख १० वीच्या प्रमाणपत्रात नोंदवलेल्या तपशीलाशी अगदी तंतोतंत जुळली पाहिजे.

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

चुका सुधारण्यासाठी नवीन अर्ज करण्याची मुभा

एनटीएने आणखी एका नोटिसमध्ये उमेदवारांना मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने आधी भरलेल्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक केली असेल किंवा चुकीची माहिती नोंदवली असेल, तर तो नवीन फ्रेश अर्ज सादर करू शकतो. नवीन फॉर्म जमा केल्यावर विद्यार्थ्याला एक नवीन ॲप्लिकेशन नंबर दिला जाईल. मात्र, आधी भरलेली परीक्षा फी ना परत केली जाईल ना नवीन फॉर्ममध्ये ॲडजस्ट केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना केवळ किरकोळ बदल करायचे आहेत, त्यांच्यासाठी २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करेक्शन विंडोची सुविधा उपलब्ध असेल.

जेईई मेन २०२७ सत्र १ च्या महत्त्वाच्या तारखा

  • विनालेट फी नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ नोव्हेंबर २०२६
  • लेट फीसह अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ते २६ नोव्हेंबर २०२६
  • अर्जात सुधारणा करण्याची मुदत: २७ ते २९ नोव्हेंबर २०२६
  • परीक्षा तारीख: २० ते २८ जानेवारी २०२७
Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

एनआरआई (NRI) अर्जदारांसाठी विशेष सल्ला

एनटीएने एनआरआई विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी अर्ज करताना आपल्या पासपोर्टवर नोंदवलेले नाव आणि इतर तपशील १० वीच्या मार्कशीटशी काळजीपूर्वक तपासून पहावेत, जेणेकरून परीक्षेच्या वेळी कोणतीही चूक होणार नाही. अर्ज प्रक्रिया किंवा पासपोर्ट संबंधी कोणत्याही तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन संपर्क साधू शकतात किंवा एनटीएच्या हेल्पलाइन नंबर 011-40759000 / 011-69227700 वर संपर्क साधू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्या विद्यार्थ्यांकडे आधार किंवा पॅन कार्ड नाही, ते कशाच्या आधारे अर्ज करू शकतात?

    Ans: एनआरआई किंवा इतर उमेदवार आता आपल्या पासपोर्टचा वापर ओळखीचा पुरावा म्हणून करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

  • Que: जेईई मेन २०२७ सत्र १ साठी विनालेट फी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: विनालेट फी नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ आहे.

  • Que: अर्जात चुकीची माहिती भरल्यास नवीन अर्ज करता येतो का?

    Ans: होय, जर विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये चूक केली असेल तर तो नवीन फ्रेश अर्ज सादर करू शकतो, मात्र आधी भरलेली परीक्षा फी परत किंवा ॲडजस्ट केली जाणार नाही. तसेच २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करेक्शन विंडो उपलब्ध असेल.

Web Title: Jee main 2027 registration passport allowed nta guidelines sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • education
  • Education News in Marathi
  • JEE

संबंधित बातम्या

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
1

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक
2

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर
3

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा
4

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.