Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITI मध्ये भरती! आजच अर्ज करा जाऊन साईटवरती; मिळवा ६० हजारापर्यंत पगार

आयटीआय लिमिटेडने यंग प्रोफेशनल पदांसाठी २१५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट, टेक्नीशियन आणि ऑपरेटर पदांसाठी अनुक्रमे ६० हजार, ३५ हजार व ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 06:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयटीआय लिमिटेड (ITI Limited) ने यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर केली असून, या भरतीद्वारे एकूण २१५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. कंपनीकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ : नोंदणीत अनुत्साह! टार्गेट ६५ लाख असतानाही प्रत्यक्षात ३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

आयटीआय लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यंग प्रोफेशनल या श्रेणीत विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये यंग प्रोफेशनल (ग्रॅज्युएट), यंग प्रोफेशनल (टेक्नीशियन), यंग प्रोफेशनल (ऑपरेटर) या पदांचा समावेश आहे. भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवार www.itiltd.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक मासिक वेतन दिले जाणार आहे. यंग प्रोफेशनल (ग्रॅज्युएट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये वेतन मिळणार आहे. यंग प्रोफेशनल (टेक्नीशियन) पदासाठी ३५ हजार रुपये प्रतिमाह वेतन देण्यात येईल. तर यंग प्रोफेशनल (ऑपरेटर) पदावर नियुक्त उमेदवारांना ३० हजार रुपये प्रतिमाह वेतन दिले जाणार आहे. हे वेतनमान पाहता ही भरती तरुणांसाठी चांगली करिअर संधी मानली जात आहे.

उमेदवारांची निवड प्रक्रिया एकूण दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन करण्यात येईल. पात्रता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारे उमेदवारांना वेटेज सिस्टमद्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना एसेसमेंट टेस्टसाठी बोलावले जाईल. या चाचणीनंतर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. मेरिट लिस्टमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना करार तत्त्वावर (Contract Basis) नियुक्ती दिली जाणार आहे.

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात व्यापक सुधारणा! शालेय शिक्षण विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम

अर्ज कसा कराल?

  1. सर्वप्रथम आयटीआय लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.itiltd.in वर जा.
  2. आवश्यक माहिती भरून नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण करा.
  3. नोंदणीनंतर लॉगिन करून शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर आवश्यक तपशील भरा.
  4. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
भरतीसंबंधी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सरकारी क्षेत्रात चांगल्या वेतनासह काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आयटीआय लिमिटेडची ही भरती एक उत्तम संधी ठरणार आहे.

Web Title: Recruitment at rti immidiate job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Career
  • RTI

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा
1

विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा

Sports Commentary Career: खेळाची आवड आहे? स्पोर्ट्स कमेंटेटर बनून क्रीडा क्षेत्रात कमवा नाव; ‘हे’ कोर्सेस पडतील उपयोगी
2

Sports Commentary Career: खेळाची आवड आहे? स्पोर्ट्स कमेंटेटर बनून क्रीडा क्षेत्रात कमवा नाव; ‘हे’ कोर्सेस पडतील उपयोगी

Career in Translation: पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर कसे बनतात? जाणून घ्या भाषांतर क्षेत्रातील करिअर संधी आणि पात्रता
3

Career in Translation: पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर कसे बनतात? जाणून घ्या भाषांतर क्षेत्रातील करिअर संधी आणि पात्रता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.