Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल ५० हजार उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया

महाराष्ट्र राज्य शासनाकडून मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे ज्याद्वारे विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमात तब्बल ५० हजार योजनादूतांची भरती केली जाणार आहे. जाणून घ्या या भरतीविषयी.

  • By नारायण परब
Updated On: Sep 06, 2024 | 10:33 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अंतर्गत तब्बल ५० हजार योजनादूतांची निवड केली जाणार आहे त्यामुळे ही मोठी संधी आहे. १३ सप्टेंबर पर्यंत उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज भरायचा आहे.

 पाच हजार लोकसंख्येमागे एक अशी होणार निवड

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. सरकारच्या वतीने जनजागृती करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे.

हे देखील वाचा- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत भरती, पगार 1 लाख 10 हजार रुपयापर्यंत

भरतीप्रक्रियेतील विविध पात्रता निकष

वयोगट

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार  १८ ते ३५ या वयोगटातील असावा.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवारास संगणक ज्ञान असावे.

इतर निकष

उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा- मंत्रालयामध्ये PR तसेच मार्केंटिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; आताच करा अर्ज

अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासोबत आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला  (सक्षम यंत्रणेने दिलेला) जोडायचा आहे. उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

या भरतीप्रक्रियेविषयी अधिक माहिती शासनाच्या या  www.mahayojanadoot.org  संकेतस्थळावर मिळू शकते. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि त्यानंतर अर्जप्रक्रिया पार पाडावी.  योजनादूतचे सोशल मीडियावरही ऑफिशल अकाऊंट उपलब्ध आहे.

 

Web Title: Recruitment of around 50 thousand candidates under mukhya mantri yojandoot know the application process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 10:33 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द
1

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
2

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
3

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

‘शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची’; आंतरराष्ट्रीय सहकार दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
4

‘शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची’; आंतरराष्ट्रीय सहकार दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.