Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची’; आंतरराष्ट्रीय सहकार दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकाराला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 07:51 PM
मराठी भाषा जतनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, जागतिक मराठी केंद्रालाही गती

मराठी भाषा जतनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, जागतिक मराठी केंद्रालाही गती

Follow Us
Follow Us:

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज आणि विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

‘महाराष्ट्राने सहकाराचे महत्त्व शंभर वर्षांपूर्वीच ओळखले’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने शंभर वर्षांपूर्वीच सहकार चळवळीचे महत्त्व ओळखत शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी सहकारी संस्थांची उभारणी केली. त्यानंतर पतसंस्था, सहकारी बँका, कृषी, दुग्धव्यवसाय, गृहनिर्माण आणि मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत सहकाराची मजबूत पायाभरणी झाली.

धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील आणि वैकुंठभाई मेहता यांसारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे योगदानही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

PMRDA News: पीएमआरडीए गतिमान होणार! ६१ ‘एमपीएससी’ लिपिक लवकरच सेवेत रुजू

‘सहकाराला आता राष्ट्रीय स्तरावर महत्त्व’

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून देशातील सर्वात मोठे सहकारी जाळे या राज्यात आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये प्रथमच स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्याचा उल्लेख केला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सहकार धोरण, ६३ हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचे डिजिटायझेशन, पाच वर्षांत दोन लाख नवीन ‘पॅक्स’ उभारण्याचा निर्णय, तसेच राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, ऑर्गॅनिक्स संस्था आणि बीज सहकारी समितीसारख्या उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही चांगली कामगिरी केली’

सहकारी बँकांच्या कामगिरीचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की, एकेकाळी सहकार क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र प्रत्यक्षात सहकारी बँकांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवत असून ग्रामीण विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्वयं पुनर्विकासामुळे मराठी माणसाचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण’

गृहनिर्माण सहकारी संस्थांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील ४० ते ४५ टक्के सहकारी संस्था या गृहनिर्माण क्षेत्रातील आहेत. स्वयं पुनर्विकास धोरणामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वतःचा पुनर्विकास करण्याचा अधिकार मिळाला आहे.

“मुंबईतील अनेक मराठी कुटुंबे ४०० चौरस फुटांच्या घरातून १००० चौरस फुटांच्या घरात जात आहेत. त्यांचा आनंद पाहणे ही मोठी समाधानाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला गती

सहकारी संस्थांना ग्रामीण भागात विविध प्रकारची विकासकामे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (NCDC) माध्यमातून अर्थसाहाय्यही दिले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकाभिमुखता आणि सामान्य नागरिकांशी असलेली बांधिलकी ही सहकार क्षेत्राची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.

‘विहानच्या मृत्यूला जबाबदार कोण?’ चेंबूर दुर्घटनेवरून शिवसेनेचा बीएमसीवर हल्लाबोल; ‘मुंबईतील सर्व झाडांचे ऑडिट करा’

सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध संस्था, पदाधिकारी आणि मान्यवरांना ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’, ‘सहकार रत्न’, ‘सहकार गौरव’, ‘महिला सहकार शक्ती’, ‘सहकार विभूषण’ यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, विनय कोरे, चित्रा वाघ, रवींद्र चव्हाण यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Devendra fadnavis on cooperative sector international cooperatives day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
1

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
2

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
3

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर
4

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.