फोटो सौजन्य - Social Media
भारतीय मंत्रालयामध्ये काम करण्याचे अनेक जण स्वप्न पाहत असतात. परंतु, प्रत्येकाच्या नशिबी ध्येय प्राप्ती नसते. पण नशिबाचे गाणे गाऊन जिद्यपणा सोडणे म्हणजे एक प्रकारे हार मानणे असते. जर तुम्हला मंत्रालयामध्ये काम करण्याची खरंच इच्छा आहे तर ही व्हॅकन्सी खरंच तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सांस्कृतिक मंत्रालयामध्ये काम करता येणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या हवाल्यातील नॅशनल काउंसिल ऑफ साइंस म्यूजियम (NCSM) मध्ये कामाची संधी उपलब्ध झाली आहे. पब्लिक रिलेशन (PR) तसेच मार्केटिंग क्षेत्रात या संधी उपलब्ध आहेत. एकंदरीत, निवडीत उमेदवाराला पब्लिक रिलेशन (PR) तसेच मार्केटिंग क्षेत्रात काम करता येणार आहे.
हे देखील वाचा : नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ‘NAAC’ चा ‘A’ ग्रेड !
या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनके उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर लवकर अर्ज करण्यात यावे. इच्छुक उमेदवारांना २३ सप्टेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी मुदती अगोदर अर्ज करावा अन्यथा मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रकियेत एसिसिटेंट पब्लिक रिलेशन एग्जीक्यूटिव, पब्लिक रिलेशन एग्जीक्यूट, मार्केटिंग एग्जीक्यूटिव, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओग्राफर तसेच व्हिडीओ एडिटरच्या रिक्त पदांचा विचार केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या पदांसाठी अर्ज कर्त्या उमेदवाराला काही अटी शर्तींना पात्र असणे बंधनकारक आहे. या अटी वय तसेच शैक्षणिक आहेत.
असिस्टंट पब्लिक रिलेशन एक्झिक्युटिव्ह, पब्लिक रिलेशन एक्झिक्युटिव्ह आणि व्हिडीओग्राफर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे पीजी डिग्री/पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन ऑफिसर (जनसंपर्क अधिकारी) आणि मीडिया सायन्स असणे आवश्यक आहे. MBA/PGDM केलेले उमेदवार मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ग्राफिक डिजाइनरच्या पदासाठी अर्ज करू इच्छुक असलेले उमेदवार पत्रकारिता आणि जनसंवाद/मीडिया सायन्स या विषयांमध्ये पदवीधार हवे किंवा त्यांच्याकडे बीए आर्ट्स/कमर्शिलय आर्ट्सची डिग्री असावी.
हे देखील वाचा : ‘ही’ कंपनी देतेय झोपा काढण्याचे इतके पैसे; त्वरित अर्ज करा
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे ते ४० वर्षे आहे. तसेच निवडीत उमेदवाराला ३०,००० ते ४५,००० इतके दरमाह वेतन मिळण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती अभ्यासण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.