Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द

विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज परतफेडीची अटही रद्द करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 09:32 PM
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा ₹50 हजारांवरून ₹2 लाख, 'ही' अटही रद्द

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा ₹50 हजारांवरून ₹2 लाख, 'ही' अटही रद्द

Follow Us
Follow Us:
  • कर्जमाफीची मर्यादा ₹50 हजारांवरून थेट ₹2 लाख
  • 2026-27 च्या पीक कर्ज परतफेडीची अट रद्द
  • अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार
 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची मर्यादा ₹50 हजारांवरून थेट ₹2 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यासोबतच प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज परतफेडीची अटही रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘2029 पर्यंत थांबू शकलो असतो, पण तसे केले नाही’

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी हा कोणताही कायमस्वरूपी उपाय नसून परिस्थितीची गरज म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. ते म्हणाले, “आम्ही निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, पण तसे केले नाही. शेतकरी अडचणीत असेल तर त्याला दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” यावेळी त्यांनी महायुती सरकार दरवर्षी सुमारे ₹25 हजार कोटींची वीजमाफी देत असल्याचाही उल्लेख केला.

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

महात्मा फुले कर्जमाफी योजनेत मोठा बदल

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा ₹50 हजार होती. आता हा लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याशिवाय, प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी 2026-27 च्या पीक कर्जाची परतफेड केलेली असणे बंधनकारक होती. ही अटही सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या निर्णयामुळे यापूर्वी लाभापासून वंचित राहणारे अनेक शेतकरी आता पात्र ठरणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, 2026-27 या एका वर्षाऐवजी मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या मते, 95 टक्के शेतकऱ्यांनी 2026 मधील पीक कर्जाची परतफेड केली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

Web Title: Devendra fadnavis farmer loan waiver 2 lakh announcement 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government
  • Maharashtra Monsoon Session

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम
1

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
2

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक
3

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
4

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.