Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील अभ्यासक्रमाच्या नोंदणीस सुरुवात! इच्छूक विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई विद्यापीठ च्या रसायनशास्त्र विभागाने २०२६-२७ साठी प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. दोन वर्षांचा एमएस्सी अभ्यासक्रम फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक आणि एनॅलिटिकल केमिस्ट्रीसह उपलब्ध आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई :उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भक्कम करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांमुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमांकडे मोठा ओढा दिसून येत आहे.

टॉप २५ कंपन्यांना हवे आहेत ‘हे’ विशेष गुण; लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे?

विभागामार्फत दोन वर्षांचा रसायनशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामध्ये फिजिकल, इनऑर्गेनिक, ऑर्गेनिक, एनॅलिटकल/ इंडस्ट्रीअल पॉलीमर केमिस्ट्री या शाखांचा समावेश आहे. विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयात पदवीधर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात मल्टीपल एन्ट्री-एक्झिट प्रणाली लागू करण्यात आली असून पहिल्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना बीएस्ससी (ऑनर्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन केमिस्ट्री पदवी घेऊन बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच उपलब्ध जागांनुसार एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश (लॅटरल एन्ट्री) दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाच्या सहकार्याने रसायनशास्त्रात सह पदवी अभ्यासक्रम राबविला जात असून, यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. तसेच पदवी स्तरावर ७.५ किंवा त्यापेक्षा अधिक श्रेयांक (सीजीपीए) मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा बीएस्सी केमिस्ट्री ‘ऑनर्स विथ रिसर्च’ हा विशेष अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे.

रसायनशास्त्र विभागात नॅनोपदार्थ, ऊर्जा साठवण, पर्यावरण रसायनशास्त्र, जलशुद्धीकरण, हरित रसायनशास्त्र, पॉलिमर विज्ञान आणि उत्प्रेरण अशा अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य सुरू असून विद्यार्थ्यांना प्रकल्प, संशोधन निबंध, पेटंट्स तसेच उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

मुलींसाठी सुवर्णसंधी! Amazonच्या उपक्रमाचा देशभरात विस्तार; ५०० नव्या शिष्यवृत्तींची घोषणा 

प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या सत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. नवीनचंद्र शिंपी यांनी केले आहे. तसेच प्रवेश समन्वयक डॉ. रामचंद्र थोरात यांनी विद्यार्थ्यांना अधिकृत व्हॉट्सअॅप समूहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहितीपत्रक, व्हॉट्सअॅप समूहाची लिंक तसेच क्यूआर संकेत उपलब्ध करून देण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया, समुपदेशन वेळापत्रक आणि इतर सर्व माहिती त्याद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मर्यादित जागांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर समुपदेशन सत्रात सहभागी होऊन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Registration for the chemistry department courses at the university of mumbai has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Mumbai News : फक्त आर्थिक नाही, आता मुंबई ‘कॅट कॅपिटल’, काय म्हणतोय Insta Mart चा Viral रिपोर्ट?
1

Mumbai News : फक्त आर्थिक नाही, आता मुंबई ‘कॅट कॅपिटल’, काय म्हणतोय Insta Mart चा Viral रिपोर्ट?

Priyanka Chaturvedi: ‘ते ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन…’; खासदारांच्या फोडाफोडीवर प्रियंका चतुर्वेदीचे मोठे विधान
2

Priyanka Chaturvedi: ‘ते ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन…’; खासदारांच्या फोडाफोडीवर प्रियंका चतुर्वेदीचे मोठे विधान

Pawanraje Nimbalkar Case : ३० लाखांची सुपारी, २० वर्षांचा खटला…! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?
3

Pawanraje Nimbalkar Case : ३० लाखांची सुपारी, २० वर्षांचा खटला…! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट, कोर्टात काय घडलं?

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
4

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.