Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

मुंबईतील दहिसरमध्ये भाजप पदाधिकारी सूरज प्रतापसिंह देवडा याच्याविरोधात लग्न आणि CA नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गन दाखवून धमक्या देणे आणि लाखो रुपये उकळल्याचाही आरोप आहे. आरोपी सध्या फरार असून गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 11:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भाजप पदाधिकाऱ्यावर लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोप.
  • गन दाखवून धमक्या आणि लाखो रुपये उकळल्याची तक्रार.
  • आरोपी फरार असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या नेत्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्यावर बारमधील तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि कंपनीत CA ची जॉब देण्याचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर लाखो रुपये उकळत गन दाखवून धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तरुणीने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भाजप नेत्या हा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव सूरज प्रतापसिंह देवडा असे आहे. ते दहिसर-बोरिवली भाजप मंडल महामंत्री आहेत. या प्रकरणातील बारमधील एका तरुणीने सुरज प्रतापसिंह देवडा यांच्याविरुधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सूरज देवडा याने आपण विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले, तसेच एका मोठ्या कंपनीत सीए (CA) ची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. “माझ्यासह इतरही अनेक मुलींचे यात शोषण झाले आहे,” असा खळबळजनक दावाही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.

Gadchiroli Crime: ‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार

गन दाखवून धमक्या…

सूरज देवडा याने पीडित तरुणीवर एका बारमध्ये तब्बल ५० हजार रुपयांच्या नोटा उडवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने पिडीतेकडून लाखो रुपये उकाळ्याचाही आरोप आहे. जेव्हा तरुणीने या सर्व प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला थेट गन (बंदूक) दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणाचे गांभीर्य आणि भाजप नेत्याचे नाव समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. त्यांच्या थेट आदेशानंतर दहिसर पोलीस ठाण्यात सूरज देवडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे विशेष पथक सध्या फरार आरोपी प्रतापसिंह देवडा याच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: सूरज प्रतापसिंह देवडा असे आरोपी भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

  • Que: पीडित तरुणीने कोणते आरोप केले आहेत?

    Ans: लग्न आणि CA नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक शोषण, धमक्या आणि पैशांची उकळपट्टी केल्याचा आरोप केला आहे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: मुंबई गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.

Web Title: Mumbai crime lure of a ca job promise of marriage and exploitation serious allegations against a bjp office bearer in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
1

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
4

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.