फोटो सोैजन्य- सोशल मिडिया
Top Companies India 2026: अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘टॉप कंपनी २०२६’ च्या यादीनुसार भारतातील करियरच्या उत्कर्षामध्ये आयटी क्षेत्रातील इन्फोसिस कंपनी अव्वल ठरली आहे. इन्फोसिस पाठोपाठ अॅक्सेंचर आणि अॅमेझॉन या कंपन्या या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. या यादीमध्ये जगातील २५ नामांकित कंपन्यांचा समावेश असून या वार्षिक यादीच्या १० व्या आवृत्तीत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, जागतिक स्तरावरील सल्लागार कंपन्या आणि वित्तीय क्षेत्रातील मोठ्या कंपन्या त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. यासोबतच जे.पी.मॉर्गन चौथ्या क्रमांकावर असून पाचवे स्थान एसएपी या कंपनीने पटकावले आहे.
२०२६ च्या या यादीत नवीन दहा कंपन्यांचा समावेश झाला आहे. या नव्या कंपन्यांमध्ये एसएपी, एनव्हिडिया, एचपी, मायक्रोसॉफ्ट, सँडिस्क, मार्व्हल, टेक्नॉलॉजी आणि थॉमसन रॉयटर्स यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांचा समावेश आहे. भौगोलिकद्रृष्ट्या, या नामांकित कंपन्यांमध्ये बंगळूर हे प्रमुख प्रचलित केंद्र आहे. तर त्याच्या पाठोपाठ हैद्राबाद शहर असून त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि चेन्नई यांचा क्रमांक लागतो. तसेच ही ठिकाणे खाजगी भरतीकरितादेखील प्रसिद्ध आहे.
नोकरीच्या शोधात आहात? देशातील आघाडीच्या ऊर्जा कंपनीत निघाली बंपर भरती…एकदा वाचाचं
या अहवालानुसार सध्या कंपन्याच्या नोकरभरतीच्या स्वरुपात मोठा बदल झाला आहे. या कंपन्याना आता त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांसह संवाद कौशल्य आणि समस्या निराकरण अशी कौशल्ये हवी आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये एआयच्या मदतीने वेगाने आणि कार्यक्षमतेने काम करणाऱ्या उमेद्वारांना संधी आहे.
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका
या वर्षीच्या प्रसिद्ध कंपन्यांच्या यादीवरून असे दिसून येते कि नोकरीमध्ये कर्मचाऱ्याच्या उपस्थितीप्रमाणे त्याच्या कौशल्याकडेही अधिक लक्ष दिले जात आहे. तसेच तंत्रज्ञान (TECHNOLOGY), वित्त (FINANCE) आणि सॉफ्टवेअर (SOFTWARE) क्षेत्रातील या कंपन्या मानवी कार्यक्षमता आणि मूल्य वाढवण्यासाठी एआय (AI) शी जुळवून घेणाऱ्या व्यवसायिकांच्या शोधात असल्याची भूमिका लिंक्डइनच्या करिअर तज्ञ आणि भारताच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी यांनी केले






