Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Board News: रेल्वे ग्रुप-डी परीक्षेची तारीख जाहीर! २२ हजार जागांच्या मेगाभरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज असेल?

RRB Group D Exam Date 2026 : रेल्वे भरती बोर्डातर्फे (RRB) 'ग्रुप-डी सीबीटी-१' परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पण, २२,१९५ जागांसाठी होणाऱ्या या मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नेमकी किती गुणांची आवश्यकता आहे? परीक्षा कधीपासून सुरू होणार, पेपर पॅटर्न कसा असेल आणि 'एक्झाम सिटी स्लिप' कधी मिळणार? जाणून घ्या

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 11:22 AM
रेल्वे

रेल्वे

Follow Us
Follow Us:

RRB Group D Exam Date 2026 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने ‘ग्रुप-डी सीबीटी-१’ (RRB Group-D CBT-1) परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. या मेगाभरती प्रक्रियेच्या माध्यमातून रेल्वेमधील विविध विभागांतील एकूण २२,१९५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली असून परीक्षा ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे.

रेल्वे भरती बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप-डी सीबीटी-१ परीक्षा ०३ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे शहर आणि तारीख याची माहिती परीक्षा सुरू होण्याच्या १० दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. तर अधिकृत प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा सुरू होण्याच्या ४ दिवस आधी रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

असे असेल परीक्षेचे स्वरूप आणि निगेटिव्ह मार्किंग

या परीक्षेमध्ये उमेदवारांना ९० मिनिटांत १०० गुणांचे १०० प्रश्न सोडवावे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सामान्य विज्ञान, गणित,चालू घडामोडी आणि रिझनिंग यांसारख्या विषयांचा समावेश होतो. या परीक्षेत १/३ (एक-तृतीयांश) गुणांची निगेटिव्ह मार्किंग लागू असेल. म्हणजेच प्रत्येक ३ चुकीच्या उत्तरांमागे १ गुण वजा केला जाईल. त्यामुळे उमेदवारांना काळजीपूर्वक प्रश्न सोडवावे लागणार आहेत.

Vocational Courses: १० वी नंतर पदवीची चिंता सोडा! ‘हे’ ५ कोर्से करा; मिळवा ५०,००० रुपयांपर्यंत भरगच्च पगार

उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज?

परीक्षेमध्ये पुढील टप्प्यासाठी पात्र ठरण्यासाठी रेल्वेने किमान गुणांची टक्केवारी (Cut-off) निश्चित केली आहे:

जनरल आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्ग: किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य.

एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्ग: किमान ३० टक्के गुण मिळवणे आवश्यक.

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

कोणत्या पदासाठी किती जागा?

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २२,१९५ पदांपैकी सर्वाधिक जागा ‘ट्रॅक मेंटेनर’ आणि ‘पॉइंट्समॅन’ या पदांसाठी राखीव आहेत. तर ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, पॉइंट्समॅन-बी, असिस्टंट,ऑपरेशन असिस्टंट,असिस्टंट ब्रीज,असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट (TL & AC),असिस्टंट लोको शेड यांसारख्या पदांचा समावेश होतो.  उमेदवारांना वेळेवर अपडेट्स मिळवण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Rrb group d cbt 1 exam date 2026 vacancy details admit card syllabus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • government jobs
  • indian raiway
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
1

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
2

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
3

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
4

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.