career (फोटो सौजन्य : social media)
रेल्वे भरती मंडळ ७ ऑगस्ट २०२५ पासून RRB NTPC परीक्षा घेणार आहे. RRB NTPC अंडरग्रेजुएट परीक्षा २०२५ साठी प्रवेशपत्रे जाहीर होणार आहेत. उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. RRB NTPC UG प्रवेशपत्रे संबंधित अधिकृत प्रादेशिक RRB वेबसाइटवर अपलोड केली जातील.
कोणत्या वेबसाईटवर बघता येणार?
उमेदवार अधिकृत वेबसाईटवर थेट लिंकवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. खाली दिलेले काजी अधिकृत वेबसाईट आहेत.
rrbapply.gov.in,
rrbcdg.gov.in
rrb. digialm.com
चंदीगड क्षेत्राचे उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत प्रादेशिक RRB वेबसाइट rrbcdg.gov.in (RRB NTPC प्रवेशपत्र २०२५) वरून डाउनलोड करू शकतील. तुम्ही RRB NTPCअंडरग्रेजुएट मॉक टेस्ट २०२५ वरून तुमच्या परीक्षेच्या तयारीचे मूल्यांकन करू शकता. RRB NTPC प्रवेशपत्र २०२५ शिवाय, उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यासोबतच, त्यांना सरकारी वैध ओळखपत्रासह काही कागदपत्रे देखील सोबत ठेवावी लागतील.
RRB NTPC परीक्षा नमुना २०२५
RRB NTPC CBT १ परीक्षा ७ ऑगस्ट २०२५ ते ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान घेतली जाईल. उमेदवारांना प्रत्येक RRB परीक्षेसाठी ९० मिनिटे दिली जातील. RRB NTPC UG परीक्षेत, सामान्य जागरूकता (४० गुण), गणित (३० गुण), सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (३० गुण) यासाठी गुण निश्चित केले आहेत. RRB NTPC UG परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. या सरकारी भरती परीक्षेत, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
कोणत्या पदांवर भरती होणार
RRB NTPC भरती परीक्षा २०२५ एकूण १९ दिवस चालणार आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी RRB NTPC २०२५ परीक्षेत यशस्वी झालेल्या पदवीधर स्तरावरील उमेदवारांना अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती देण्यात येणार आहे. RRB NTPC भरती २०२५ च्या यादीमध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि स्टेशन मास्टर सारख्या पदांचा समावेश आहे.
आरआरबी एनटीपीसी शिफ्ट टाइमिंग आणि रिपोर्टिंग टाइमिंग काय आहे?
आरआरबी एनटीपीसी यूजी परीक्षा २०२५ एका दिवसात ३ शिफ्टमध्ये घेतली जाईल-
शिफ्ट १: सकाळी ९:०० ते १०:३० (रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:३०)
शिफ्ट २: दुपारी १२:४५ ते २:१५ (रिपोर्टिंग वेळ: सकाळी ११:१५)
शिफ्ट ३: दुपारी ४:३० ते ६:०० (रिपोर्टिंग वेळ: दुपारी ३:००)
उमेदवार त्यांच्या प्रवेशपत्रावर शिफ्ट आणि रिपोर्टिंग वेळ तपासू शकतात.
उमेदवार त्यांच्या प्रवेशपत्रावर शिफ्ट आणि रिपोर्टिंग वेळ तपासू शकतात.
RRB NTPC प्रवेशपत्र २०२५: RRB NTPC प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
RRB NTPC UG प्रवेशपत्र २०२५ डाउनलोड करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता-
१- RRB NTPC UG प्रवेशपत्र २०२५ डाउनलोड करण्यासाठी, तुमच्या प्रदेशाच्या अधिकृत RRB वेबसाइटला भेट द्या.
२- होम पेजवर दिलेल्या ‘Download Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
३- नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे तपशील प्रविष्ट करून लॉगिन करा.
४- असे केल्याने, RRB NTPC प्रवेशपत्र २०२५ तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
५- ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.