Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Sainik School Career Options : सैनिक स्कूल ही केवळ फौजात पाठवणारी फॅक्टरी नाही, तर ही मुलांची पर्सनॅलिटी आणि लीडरशिप स्किल्स विकसित करणारी केंद्रे आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 05, 2026 | 03:33 PM
SAINIK SCHOOL

SAINIK SCHOOL

Follow Us
Follow Us:

Sainik School Career Options :  सैनिक शाळा म्हटले की, डोळ्यांसमोर खाकी वर्दी आणि सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करणारी मुले उभी राहतात. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळणे म्हणजे केवळ भारतीय सैन्यात (थल सेना, नौसेना आणि वायुसेना) जाणे असाच अनेकांचा समज असतो. पण, वास्तव खरोखरच असे आहे का? सैनिक स्कूल ही केवळ फौजात पाठवणारी फॅक्टरी नाही, तर ही मुलांची पर्सनॅलिटी आणि लीडरशिप स्किल्स विकसित करणारी केंद्रे आहेत.

नॅशनल डिफेंस अकॅडमीसाठी (NDA) कॅडेट्स तयार करणे हा सैनिक स्कूलच्या स्थापनेचा मूळ उद्देश होता. मात्र, येथे मिळणारे शिक्षण मुलांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर अव्वल बनवते. पहाटे ५ च्या परेडपासून रात्रीच्या सेल्फ-स्टडीपर्यंतचे टाईमटेबल मुलांमध्ये अशी शिस्त रुजवते, जी त्यांना आयुष्यात कधीच हरू देत नाही. देशातील कोणत्याही सैनिक स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात आपले नाव कमावतात, ते जाणून घेऊया.

सैनिक स्कूलमध्ये शिकणारी मुले काय बनतात?

अनेक मुलांना सैन्यात जायचे नसते, पण शिक्षण सैनिक स्कूलमधून घ्यायचे असते. अशात सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला म्हणजे सैन्यातच जावे लागणार का, असा संभ्रम अनेकांच्या मनात असतो, पण तसे अजिबात नाही. सैनिक स्कूलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्तम करिअर पर्याय आता आपण जाणून  घेऊया.

भारतीय सशस्त्र दल (NDA आणि CDS):

सैनिक स्कूलचा सर्वात मोठा उद्देश मुलांना एनडीए (NDA) आणि कंबाइंड डिफेंस सर्व्हिसेसद्वारे भारतीय थल सेना, नौसेना आणि वायुसेनामध्ये अधिकारी बनवणे हा असतो. देशाच्या सैन्यात उच्च पदांवर विराजमान असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा एक मोठा हिस्सा आहे. हे विद्यार्थी लेफ्टनंट, कॅप्टन, स्क्वॉड्रन लीडर आणि ॲडमिरल यांसारख्या प्रतिष्ठित पदांपर्यंत पोहोचतात.

सिव्हिल सर्व्हिसेस (IAS आणि IPS):

जे मुले सैन्याची मेडिकल परीक्षा पास करू शकत नाहीत किंवा काही कारणास्तव एनडीएत जाऊ शकत नाही, ते सिव्हिल सर्व्हिसेसचा मार्ग निवडतात. सैनिक स्कूलमध्ये मिळणारी जनरल नॉलेजची पायाभरणी, देश-जगाची समज आणि कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता त्यांना यूपीएससी परीक्षेत खूप मदत करते. देशात अनेक नामवंत IAS आणि IPS अधिकारी हे सैनिक स्कूलचीच देणगी आहेत.

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

कॉर्पोरेट जगत् आणि मल्टिनॅशनल कंपन्या:

सैनिक स्कूलमध्ये टीमवर्क, टाईम मॅनेजमेंट आणि क्राइसिस मॅनेजमेंट अतिशय बारकाईने शिकवले जाते. याच कारणामुळे आज Google, Amazon, Tata आणि Reliance सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सैनिक स्कूलचे अनेक जुने विद्यार्थी टॉप मॅनेजमेंट, प्रोजेक्ट हेड आणि HR सारख्या लीडरशिप रोलमध्ये कार्यरत आहेत.

मर्चंट नेवी आणि एव्हिएशन सेक्टर:

साहसी, शिस्तप्रिय आणि गतिमान जीवनशैलीची आवड असणारे सैनिक स्कूलचे विद्यार्थी मर्चंट नेवीमध्ये कॅप्टन किंवा मरीन इंजिनिअर सुद्धा बनतात. याशिवाय, कमर्शियल पायलट होण्याच्या शर्यतीतही ही मुले बऱ्यापैकी पुढे असतात. सैनिक स्कूलचे कठोर प्रशिक्षण त्यांना मानसिक आणि तांत्रिक अशा दोन्ही बाबतीत मजबूत बनवते.

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

खेळ, संशोधन आणि उद्योजकतार :

सैनिक स्कूलमध्ये खेळ हा केवळ एक अतिरिक्त उपक्रम नसून दैनंदिन जीवनाचा एक भाग असतो. येथे शिक्षण घेणारे मुले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू बनतात. दुसरीकडे, काही विद्यार्थी स्वतःच्या कंपन्या सुरू करून यशस्वी उद्योजक बनतात. त्यांच्यात असलेली धोका पत्कारण्याची क्षमता त्यांना व्यवसायातही नवीन उंचीवर घेऊन जाते.

Web Title: Sainik school students career options marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • maharashtra government school

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
2

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
3

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
4

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.