Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

Salary vs Experience: तुम्हाला वय, अनुभव आणि जबाबदाऱ्यांनुसार योग्य पगार मिळतोय का? कमी वेतन मिळत असल्याचे ५ संकेत आणि पगारवाढीसाठी कसे बोलावे, जाणून घेण्यासाठी एकदा वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 23, 2026 | 03:56 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • जबाबदाऱ्या वाढूनही पगार तिथेच?
  • अनुभवानुसार पगार पुरेसा आहे का?
  • पगाराबाबत कसे बोलावे?
Salary vs Experience: महिनाभरच्या कष्टानंतर पगाराचा मेसेज मन आनंदी करते, मात्र कधी विचार केले आहे का की वय अनुभव आणि रोजच्या धावपळीच्या तुलनेत हा पगार तुमच्या क्षमतेनुसारच मिळतो का? अनेकदा आपण कामात इतके गुंतले असतो की आपल्या मार्केटच्या व्हॅल्यूचा अंदाज येत नाही. कधीकधी जबाबदाऱ्या जास्त पण पगार त्याच पातळीवर अडकून असतो. अनेक जण तर वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी किंवा एकाज पे स्केलवर टिकून राहतात.अनेक जण स्वीच करण्यासही घाबरतात, परंतु ज्यांना असे वाटते की त्यांना त्यांच्या कामाची योग्य किंमत मिळायला हवी त्यांनी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अनुभवानुसार पगार पुरेसा आहे का?

प्रत्येकाला मेहनत, वेळ आणि क्षमतेनुसार योग्य सन्मानाची अपेक्षा असते. पगार हा त्याचा सर्वात मोठा भाग आहे. मात्र, अनेकदा लोक आपल्या वयाच्या आणि अनुभवाच्या तुलनेत कमी वेतनावर काम करत राहतात. जर तुम्हीही तुमच्या पगाराबाबत साशंक असाल, तर काही स्पष्ट संकेतांवरून सत्य समजू शकते. तुम्हाला कामाच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याचे दर्शवणाऱ्या या ५ गोष्टी जाणून घ्या.

१. जबाबदाऱ्या वाढल्या, पण पगार तिथेच अडकून राहिला

जेव्हा तुमची भूमिका बदलते, नवीन टीम किंवा नवीन कामे तुमच्या खांद्यावर येतात, तेव्हा पगारातही त्याचा परिणाम दिसायला हवा. जर तुम्ही आधीपेक्षा जास्त काम सांभाळत असाल, इतरांना मार्गदर्शन करत असाल, पण पगारात फारसा बदल झाला नसेल, तर हा कमी पगाराचा थेट संकेत आहे.

२. समवयस्क सहकारी आणि मार्केटच्या तुलनेत खूप मागे असणे

तुमच्या वयाचे आणि जवळपास तितकाच अनुभव असलेल्या मित्रांशी किंवा इंडस्ट्रीतील इतर लोकांशी बोलल्यास तुमच्या स्थितीचा अंदाज येऊ शकतो. त्याच कामासाठी आणि अनुभवासाठी मार्केटमध्ये खूप जास्त पगार मिळत असेल आणि तुमचे पॅकेज खूपच कमी असेल, तर तुम्हाला कमी वेतन मिळत असण्याची शक्यता आहे.

३. नवीन कौशल्ये शिकूनही कोणताही मोबदला नाही

वेळेनुसार तुम्ही एखादे नवीन टूल, भाषा, तंत्रज्ञान किंवा मॅनेजमेंटचे कौशल्य शिकला असाल आणि त्याचा कंपनीला थेट फायदा होत असेल, पण पगार मात्र तसाच असेल, तर याचा अर्थ तुमच्या वाढलेल्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन होत नाही.

Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठात लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

४. महागाई आणि वाढत्या गरजांशी ताळमेळ न बसणे

वय वाढण्यासोबत घर-कुटुंब, आरोग्य, प्रवास किंवा बचतीशी संबंधित खर्चही वाढतात. जर तुमचा पगार इतकाही वाढत नसेल की रोजच्या वाढत्या महागाईला आणि बदलत्या गरजांना आरामात पेलता येईल, तर हा आर्थिकदृष्ट्या मागे राहण्याचा संकेत आहे.

५. पगार किंवा अप्रेजलचा विषय निघताच टाळाटाळ होणे

जेव्हाही तुम्ही तुमच्या कामाच्या बदल्यात चांगल्या पगाराची किंवा वाढीची बोलणी करता, तेव्हा प्रत्येक वेळी केवळ ‘पुढच्या वर्षी पाहू’ किंवा ‘बजेट टाइट आहे’ असेच उत्तर मिळत असेल, तर ही वारंवार होणारी टाळाटाळ तुमच्या कामाचे योग्य मोल होत नसल्याचे दाखवते.

Fake Job Offer Letter: नोकरीच्या नावाखाली फसवणूक कशी ओळखाल? फर्जी जॉब ऑफर टाळण्याच्या ५ महत्त्वाच्या टिप्स

पगाराबाबत कसे बोलावे?

तुमच्या कामाचा रेकॉर्ड तयार ठेवा. तुम्ही कोणकोणते प्रकल्प पूर्ण केले, कोणकोणत्या नवीन गोष्टी शिकलात आणि टीम किंवा संस्थेला काय फायदा झाला—याचे ठोस दाखले सोबत ठेवा. योग्य वेळ पाहून एकदम शांत आणि व्यावसायिक पद्धतीने तुमची बाजू मांडा. तसेच मधूनच जॉब मार्केटमधील ट्रेंड आणि कौशल्यांच्या मागणीवर लक्ष ठेवा. यामुळे तुम्हाला तुमची खरी किंमत समजेल आणि पूर्ण आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आपल्याला कामाच्या तुलनेत कमी पगार मिळतोय हे कसे ओळखावे?

    Ans: वाढलेल्या जबाबदाऱ्यांनुसार पगार न वाढणे, समवयस्क सहकारी व मार्केटपेक्षा पॅकेज कमी असणे, नवीन कौशल्ये शिकूनही मोबदला न मिळणे आणि अप्रेजलवर टाळाटाळ होणे यावरून कमी पगाराचा अंदाज येतो.

  • Que: पगारवाढीबाबत व्यवस्थापनाशी कसे बोलावे?

    Ans: पूर्ण केलेले प्रकल्प, नवीन कौशल्ये आणि संस्थेला झालेला फायदा याचे ठोस दाखले तयार ठेवा, मार्केटमधील ट्रेंड तपासा आणि योग्य वेळी शांत व व्यावसायिक पद्धतीने तुमची बाजू मांडा.

  • Que: वाढत्या महागाईच्या काळात पगाराचा आढावा का घ्यावा?

    Ans: वयानुसार घर-कुटुंब, आरोग्य, प्रवास आणि बचतीचे खर्च वाढतात; त्यामुळे वाढत्या गरजा आणि महागाईशी पगार जुळतोय की नाही, हे तपासणे आर्थिक नियोजनासाठी गरजेचे असते.

Web Title: Salary vs experience 5 signs you are underpaid marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Job
  • Marathi News
  • Salary

संबंधित बातम्या

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?
1

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?

Fake Job Offer Letter: नोकरीच्या नावाखाली फसवणूक कशी ओळखाल? फर्जी जॉब ऑफर टाळण्याच्या ५ महत्त्वाच्या टिप्स
2

Fake Job Offer Letter: नोकरीच्या नावाखाली फसवणूक कशी ओळखाल? फर्जी जॉब ऑफर टाळण्याच्या ५ महत्त्वाच्या टिप्स

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!
3

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठात लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
4

Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठात लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.