Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

घोडाझरी कॉरिडॉरमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षित मुक्त संचारासाठी उभारण्यात येत असलेल्या इको ब्रिजचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2026 | 03:00 PM
Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

Follow Us
Follow Us:
  • कामाच्या कासवगतीमुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला
  • जंगलातून जाणाऱ्या महामार्गामुळे वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता
  • वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे
तळोधी: नागभीड-सिंदेवाही मार्गावरील मिंडाळा फाटा ते चिधिमाल फाटा यादरम्यान घोडाझरी कॉरिडॉरमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षित मुक्त संचारासाठी उभारण्यात येत असलेल्या इको ब्रिजचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कामाच्या कासवगतीमुळे एकीकडे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

Chandrapur News: भद्रावतीत पाणीटंचाईचे संकट? नियमित पाणी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा माजी नगराध्यक्षांचा इशारा

नागभीडपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. घोडाझरी अभयारण्य हे ताडोबा-ब्रह्मपुरी वन्यजीव कॉरिडॉरचा भाग असल्याने या जंगल परिसरातून वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानडुक्कर, ससा यांसह विविध वन्यप्राण्यांचा नियमित वावर असतो.  (फोटो सौजन्य – AI Created)

जंगलातून जाणाऱ्या महामार्गामुळे वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता असते. हे अपघात टाळण्यासाठी शासनाने या मार्गावर इको ब्रिज तसेच वन्यजीव अंडरपास उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाची गती पाहता वन्यजीव संरक्षणाचा उद्देशच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामासाठी रस्त्याचा काही भाग अर्धवट खोदून ठेवण्यात आला आहे.

ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना धुळीमुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असताना रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते.

अपूर्ण रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेशा सूचना फलकांचा आणि रात्री स्पष्ट दिसणाऱ्या रेडियम पट्ट्यांचा अभाव असल्यास धोका आणखी वाढू शकतो. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी हाती घेण्यात आलेले कामच प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित वनविभाग आणि बांधकाम यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था

इको ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे

इको ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी. आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेट्स आणि रेडियम पट्टे लावावेत, अशी मागणी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असताना इको ब्रिजच्या कामाला गती कधी मिळणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Eco bridge construction delayed on nagbhid sindewahi road slow work raises safety concerns for wildlife and commuters hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानमधील हेरिटेज वास्तूंच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह! RTI मधून धक्कादायक माहिती समोर, नगरपरिषदेची चौकशी होणार
1

Raigad News: माथेरानमधील हेरिटेज वास्तूंच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह! RTI मधून धक्कादायक माहिती समोर, नगरपरिषदेची चौकशी होणार

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम
2

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका
3

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका
4

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.