Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?

Ajay Atul Nashik Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्यावर मुख्य कुंभमेळा गीतासह इतर गाण्यांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबवता त्यांची थेट निवड करण्यात आली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 23, 2026 | 03:32 PM
Ajay Atul Nashik Kumbh Mela: (सौजन्य- सोशलमीडिया)

Ajay Atul Nashik Kumbh Mela: (सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कुंभमेळ्याच्या गाण्याची जबाबदारी अजय-अतुल यांच्याकडे
  • निविदा न काढताच संगीतकार जोडीची निवड
  • एक कोटी रुपये आणि GST खर्चाला मंजुरी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्यानिमित्ताने भक्ती आणि संस्कृतीचा वारसा संगीताच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. यासाठी फेमस संगीतकार अजय-अतुल यांच्यावर कुंभमेळा गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खास म्हणजे, या कामासाठी टेंडर मागवण्याऐवजी प्राधिकरणाने थेट या संगीतकार जोडीची निवड केली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू असून, रस्ते-पाणी सारख्या कामांसोबतच या सोहळ्याची सांस्कृतिक ओळख बनवण्यावर पण सरकारचा भर आहे. कुंभपर्वाच्या सुरुवातीला झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात याची झलक बघायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं कुंभमेळा गाणं सादर करण्यात आलं. Ajay Atul Nashik Kumbh Mela:

 ‘भाग्य जन्माचे सोयरे झाले…’ गाणं झालं हिट’

भाग्य जन्माचे सोयरे झाले, कुंभनगरीत मला घेऊन आले’ असे या गाण्याचे बोल आहेत. गोदावरी नदीचं महत्व आणि कुंभपर्वाचं धार्मिक महत्व गाण्यातून मांडण्यात आलं. या गाण्याला सध्या चांगली लोकप्रियता मिळत असून, त्याचे बोल अनेकांच्या लक्षात राहिले.

एक कोटी रुपये आणि GST खर्चाला मंजुरी

कुंभमेळा गाण्याच्या निर्मितीसाठी अजय-अतुल यांनी राज्य सरकारकडे स्वतःचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये मूळ संगीत तयार करणं, स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणं आणि मिक्सिंग करणं अशा कामांचा समावेश होता. या प्रस्तावानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने त्यांच्याकडे गाणं बनवण्याचं काम सोपवण्याचा निर्णय घेतला.

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका

यासाठी वेगळी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नाही.या जबाबदारीचं स्वरूप फक्त एका गाण्यापुरतं मर्यादित नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कुंभमेळा गाण्यासोबतच दुसरी गाणी पण अजय-अतुल तयार करणार आहेत. या पूर्ण कामासाठी एक कोटी रुपये आणि त्यावर वस्तू व सेवा कर (GST) अशी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

 अजय-अतुल यांच्या निवडीमागे काय कारण?

अजय-अतुल यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. त्यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान, संगीतकौशल्य तसेच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांची असलेली जाण या गोष्टींचा विचार करून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचं प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं. याआधी अनेक नामवंत कलाकार होऊन गेले असले, तरी सध्याच्या काळात अजय-अतुल यांचं नाव संगीत क्षेत्रात खास चर्चेत असल्याचं पण निवडीमागच्या कारणांमध्ये नमूद करण्यात आलंय.

 टेंडर प्रक्रिया का राबवली नाही?

अजय-अतुल यांच्या निवडीबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “अजय-अतुल यांचं संगीत कौशल्य, राज्याची संस्कृती आणि परंपरा यांची त्यांना असलेली जाण तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी महाराष्ट्राचा वाढवलेला नावलौकिक लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. टेंडर प्रक्रिया राबवली असती, तर त्यांनी त्यात भाग घेतला नसता.

Salim Kodathur Health News: फेअरनेस क्रीमचा वापर पडला महागात! प्रसिद्ध गायकाचा दावा; किडनीचा गंभीर आजार अन् पायांना सूज

त्यामुळे कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम आणि आम्ही टेंडर प्रक्रिया न राबवता त्यांची निवड केली.”अशा प्रकारे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांस्कृतिक आणि संगीतविषयक उपक्रमांसाठी अजय-अतुल यांच्याकडे मुख्य गाण्यासह दुसऱ्या गाण्यांच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाशिक कुंभमेळ्याच्या गाण्याची जबाबदारी कोणाला देण्यात आली आहे?

    Ans: प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांना कुंभमेळ्याच्या मुख्य गीतासह इतर गाण्यांच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • Que: अजय-अतुल यांची निवड टेंडर प्रक्रियेद्वारे झाली का?

    Ans: नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता त्यांची थेट निवड केली.

  • Que: कुंभमेळ्याच्या गाण्यांसाठी किती खर्च मंजूर झाला आहे?

    Ans: संपूर्ण संगीतनिर्मितीच्या कामासाठी एक कोटी रुपये आणि त्यावर GST खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Ajay atul nashik kumbh mela song rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • Nashik

संबंधित बातम्या

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!
1

Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम
2

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका
3

IMDb रेटिंगमध्ये ‘रामायण’ची बाजी! यशला मागे टाकत कुंभकर्ण ठरला प्रेक्षकांचा लाडका

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका
4

Auto Rickshaw Strike: रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; कोल्हापुरातही बंदला प्रतिसाद, प्रवाशांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.