जिल्हा प्रशासनाचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील ५० माध्यमिक शाळांमध्ये हे विशेष अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ३८ हजार विद्यार्थिनींना कराटेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगलीतील कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेस भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
शाळेच्या आवारात कराटेचे पंचेस आणि किक्सचा सराव करणाऱ्या मुलींना पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, श्सराव करताना मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि डोळ्यांत ध्येयाची चमक आहे, ती पाहून माझ्यातही नवी ऊर्जा संचारली. त्यांच्या मनोगतातून सकारात्मकता आणि जिद्द स्पष्टपणे जाणवते.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका पाचवीतील विद्यार्थिनीचा आवर्जून उल्लेख केला. ही मुलगी पूर्वी तिच्या आईसोबत शाळेत येत असे; मात्र कराटे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून तिचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की, आता ती एकटीच निर्धास्तपणे शाळेत येते. हा बदल म्हणजेच ‘कन्या सबळीकरण अभियाना’चे खरे यश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी ‘सांगली पॅटर्न’च्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गिता शेंडगे, कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला मुख्याध्यापिका उमा संभूस, उपमुख्याध्यापक सुभाष सावंत, पर्यवेक्षक दिलीप संकपाळ, कराटे प्रशिक्षक सचिन ढोले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.