
Sports Education Crisis, Government School Sports,
पूर्वी शाळांमधील शारीरिक शिक्षण हा शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात होता. विषेशता प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यरत असायचे. खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये शारीरिक हालचालींची गोडी निर्माण करणे, व्यायामाचे महत्त्व पटवून देणे आणि नियमित आरोग्यदायी सवयी लावणे, हे त्यांचे प्रमुख कार्य होते.
Republic Day Parade : राजधानी दिल्लीत सायंकाळनंतर वाहतुकीत बदल; बॉर्डर केल्या जाणार सील
मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शाळांमधील शारीरिक शिक्षणाची पदेच रद्द करण्यात आली आहेत किंवा त्या पदांवर भरतीच झाली नाही. माध्यमिक शाळांमध्येही निवृत्त शिक्षकांच्या जागी नवीन भरती न झाल्याने अनेक ठिकाणी ही पदे केवळ नावापुरतीच उरली आहेत. ही गंभीर परिस्थिती विशेषतः सरकारी शाळांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर होत असून, मुलांचे क्रीडा शिक्षण खाजगी संस्था किंवा खासगी क्रीडा केंद्रांवर अवलंबून राहिले आहे. मात्र, सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही संधी सहज उपलब्ध होत नाही.
आज देशाचे नाव राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या अनेक खेळाडूंची सुरुवात ही शाळेच्या मैदानातूनच झालेली आहे. जर शारीरिक शिक्षणाला योग्य महत्त्व दिले, तर जिल्हा परिषद शाळांमधूनही उद्याचे गुणवंत खेळाडू घडू शकतात. शारीरिक शिक्षण दिनानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता, “शाळेतील मैदान पुन्हा जिवंत कसे होईल?” यावर गंभीर चर्चा व ठोस कृती होणे गरजेचे आहे.
National Voter’s Day: आज झालेली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना; लोकशाही व्यवस्थेत मतदान…
मुलांनी शारीरिक शिक्षणात प्रगती करावी आणि चांगले खेळाडू घडावेत यासाठी हा विषय अत्यंत आवश्यक आहे. शरीर तंदुरुस्त असेल तरच मुले अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतात आणि सर्वांगीण विकास साधू शकतात. शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते, याचाही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत मंजूर पदांनुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांची तातडीने भरती करणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात शाळे मध्ये शारीरिक शिक्षणाकडे आवश्यक तेवढे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र ग्रामीण भागात उत्कृष्ट खेळाडू घडू शकतात. शारीरिक शिक्षण शिक्षकांची धोरणे आजही प्रभावीपणे अमलात आणली जात नाहीत. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपल्याला ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असेल, तर त्या ठिकाणी खेळाडू घडविण्याचे काम शाळा स्तरावरच झाले पाहिजे. २०४७ आपल्याला पदके मिळवायची असतील, तर शारीरिक शिक्षणाला योग्य ते महत्त्व देणे अत्यावश्यक आहे.
-दिपक राठोड शारीरिक शिक्षण शिक्षक