Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत ‘साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन! दहा हजाराहून अधिक विद्यार्थी होतील सहभागी

मुंबईतील साठये कॉलेजतर्फे ‘साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन 28 आणि 29 मार्च रोजी विलेपार्ले येथे होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात सुमारे 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2026 | 06:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील Sathey College तर्फे ‘साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले येथे महाविद्यालयाच्या परिसरात येत्या 28 आणि 29 मार्च 2026 रोजी हा दोन दिवसीय उपक्रम पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन, शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शाखांबाबत माहिती मिळावी, करिअरबाबत स्पष्टता निर्माण व्हावी आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्ध होत असलेल्या नव्या संधींची ओळख व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा कॉन्क्लेव्ह महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…

इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रवाहांची ओळख करून देण्यात येणार आहे. तज्ज्ञ, समुपदेशक आणि शैक्षणिक संस्थांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना विषय निवड, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी या कॉन्क्लेव्हमध्ये इंटर्नशिपच्या संधी, उच्च शिक्षणासंदर्भातील मार्गदर्शन तसेच थेट भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली जाणार आहे. विविध कंपन्या आणि नियोक्त्यांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून उद्योगक्षेत्रातील अपेक्षा आणि आवश्यक कौशल्यांबाबतही माहिती मिळेल.

या कार्यक्रमात 100 हून अधिक कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, प्रवेशविषयक माहिती आणि थेट भरतीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय भविष्यातील कौशल्ये आणि उदयोन्मुख उद्योग प्रवाहांवर तज्ज्ञ सत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रगती, बदलते कार्यक्षेत्र आणि यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन करतील. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक करिअरच्या मागण्या समजून घेण्यास मदत होईल.

महिला दिनानिमित्ताने घेण्यात आले महत्वाचे निर्णय! शिक्षणाबरोबर सुरक्षेलाही प्राधान्य

या कॉन्क्लेव्हमध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचाही सहभाग असणार आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास कार्यशाळांद्वारे संवादकौशल्य, करिअर नियोजन आणि उद्योगक्षेत्राची समज वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना माध्यम समन्वयक प्रा. डॉ. गजेंद्र देवडा यांनी सांगितले की, विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठे आणि उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणारे हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना योग्य माहिती आणि व्यापक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यातून विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक आणि करिअर निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

Web Title: Sathy career conclave 2026 to be organized in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.