Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

Nagpur News : कमी पर्जन्यमान आणि जलाशयांतील घटता पाणीसाठा लक्षात घेता जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकाम आणि जुन्या बोअरवेल अधिक खोल करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुधारित आदेश जारी केले असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 04, 2026 | 03:15 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कमी पर्जन्यमानामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • घरगुती वापरासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी
  • नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
Nagpur News : पावसाने पाठ फिरवल्यानंतर आता भूजल पातळीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जलाशयांमधील घटता पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी आता नवीन बोअरवेल खोदण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात सुधारित आदेश जारी केले असून ही बंदी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना लागू राहणार आहे.

कमी पर्जन्यमानामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आणि जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भूजल स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकाम तसेच जुन्या बोअरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन विभागाच्या दुष्काळ मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

घरगुती वापरासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी

प्रशासनाने या बंदीतून काही महत्त्वाच्या कामांना सूट दिली आहे. घरगुती पाणी वापरासाठी करण्यात येणारे बोअरवेल खोदकाम, जुन्या बोअरवेलचे फ्लशिंग तसेच पिण्याचे पाणी आणि पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक असलेल्या बोअरवेल खोदकामांना परवानगी राहणार आहे.

शासकीय यंत्रणेच्या अधिकृत कार्यादेशानुसार कंत्राटदारांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांनाही ही सूट लागू असेल. मात्र, या अपवादांव्यतिरिक्त सुरू असलेली अन्य सर्व खोदकामे तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या समन्वयाने तपासणी केली जाणार आहे. बोअरवेल कंत्राटदार, रिंगमालक आणि यंत्रचालकांनी बंदीच्या काळात प्रतिबंधित खोदकामे स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

खोदकाम बंद केल्यानंतर कोणतीही बोअरवेल उघडी किंवा असुरक्षित स्थितीत ठेवता येणार नाही. शासकीय पाणीटंचाई निवारणाची कामे करताना संबंधित कार्यादेशाची प्रत घटनास्थळी ठेवणे बंधनकारक असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Nagpur news jilhyat borewell khodkamavar bandicp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • drought news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
1

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर
2

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट
3

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
4

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.