
मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास
नव्या कंपनीकडील परीक्षा व्यवस्थापनात गोंधळ; नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
हाफकिन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मृणाल घाग सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये, भारतीय नाग,घोणस या सापांच्या निवास व्यवस्थेत अँस्पन लाकडाच्या भुसभुशीत काड्या आणि पारंपरिक कागदी बेडिंग यांची तुलना करण्यात आली.
हा अभ्यास डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाखापट्टणम येथे १३ व्या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा प्राणी शास्त्रज्ञ संघटनेच्या परिषदेत सादर करण्यात आला. त्याबाबत विस्तृत व्याख्यान सादरीकरणासाठी तृतीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार या संशोधनाच्या वैज्ञानिक तसेच वक्तृत्वाला अधोरेखित करत आहे.
संशोधनात असे आढळून आले की अँस्पन लाकडी बेडिंगवर ठेवलेल्या सापांमध्ये पुढील सुधारणा आढळल्या
1. अन्नग्रहणाची प्रतिक्रिया अधिक चांगली व भक्ष्य सहज स्वीकारण्याची प्रवृत्ती.
2. कात टाकण्याची प्रक्रिया अधिक जलद.
3. आक्रमकता व ताणतणावात लक्षणीय घट.
याच्या तुलनेत, कागदी बेडिंगवर ठेवलेल्या सापांमध्ये अन्नग्रहण कमी, अपूर्ण कात टाकणे आणि अधिक आक्रमक वर्तन दिसून आले. सांख्यिकीय विश्लेषणातून असे स्पष्ट झाले की बेडिंगच्या प्रकाराचा आणि ताणतणावजन्य वर्तनाचा ठोस संबंध आहे. अँस्पन बेडिंगमध्ये ठेवलेल्या सापांमध्ये आक्रमकतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
सफाळेत राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा; शालेय क्रीडा चळवळीला नवी उंची देणारी सुवर्णसंधी
सापांच्या निवासासाठी वापरल्या जाणाऱ्या पृष्ठभागाचा आर्द्रता, तापमान संतुलन आणि नैसर्गिक वर्तनावर मोठा प्रभाव पडतो. सापांचे आरोग्य अधिक स्थिर राहते. साप हाताळणे अधिक सुरक्षित होते विषनिर्मिती सातत्यपूर्ण व दर्जेदार राहते. हे सर्व घटक प्रभावी सर्पदंश प्रतिविष निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
संशोधकांच्या मते, सापांमधील ताणतणाव कमी झाल्यास त्यांची शारीरिक प्रक्रिया अधिक निरोगी राहते, ज्यामुळे प्रतिविषासाठी वापरले जाणारे सापांचे विष उच्चतम दर्जाचे बनते.भारतात दरवर्षी हजारो सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवण्यात सर्पदंश प्रतिविष महत्त्वाची भूमिका बजावते.
हाफकिन संस्था ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विष आणि प्रतिविष संशोधनात कार्यरत आहे. हाफकीन संस्थेच्या संचालिका डॉ.सुवर्णा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन सुरू असून सदर संशोधन कार्य संस्थेच्या दीर्घ परंपरेला पुढे नेत आहे. तसेच प्राणी कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य यांचा समतोल साधण्याच्या दिशेने पुराव्याधारित सुधारणा अधोरेखित करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निष्कर्षांमुळे पुढील बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते: