Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Sewa First Innovation Challenge 2026’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी!

Sewa First Innovation Challenge: 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत महाराष्ट्रातून ६५ हजारांहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 28, 2026 | 05:12 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
  • महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेत सहभागी झालेल्यांची संख्या ६५ हजारांहून अधिक
  • कुठे अर्ज करणार?
Sewa First Innovation Challenge: मुंबई – केंद्रीय कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेत सहभागी झालेल्यांची संख्या ६५ हजारांहून अधिक झाली आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता या स्पर्धेसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. विविध सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांवर नावीन्यपूर्ण व व्यवहार्य उपाय शोधणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय सुरक्षा, शहरी स्थलांतर, कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील नवकल्पनांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसमोरील संभाव्य धोके (उदा. सोशल मीडियाचा गैरवापर, बेकायदेशीर परदेशी निधीपुरवठा), शहरी लोकसंख्येतील बदल व स्थलांतर आणि लोकसंख्येच्या स्थलांतरित प्रवाहांवर लक्ष ठेवणे , कष्टकरी कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण तसेच संबंधित क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती, व्यावसायिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना एका छत्राखाली आणणे आणि इतर अशा विषयांवरही नावीन्यपूर्ण संकल्पना मांडता येणार आहेत. तसेच पाच या क्षेत्राला स्पर्धकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातून म्हणजेच महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी झाली असून, यामध्ये ४८,६८० संघांचा सहभाग झाला आहे. तसेच, ३,७८७ महिलांनी आणि १८ वर्षांखालील २,०४४ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. याशिवाय, १२,६०४ नोंदणी सामान्य प्रवर्गातून झाली असून, एकूण ७,९५२ कल्पना सादर करण्यात आल्या आहेत.

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), कंपन्या, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक व संशोधन संस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. समाजासमोरील प्रश्नांची ओळख करून त्यावर तंत्रज्ञानाधारित आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारे उपाय विकसित करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची संधी आहे. सध्या महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेत सहभागी झालेल्यांची संख्या ६५ हजारांहून अधिक झाली आहे. तरी ३० ऑक्टोबरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि वाहतूक यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्यांवर विद्यार्थ्यांनी व्यवहार्य उपाय सुचवावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांनी विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखण्यापासून ते उपाय विकसित करून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यापर्यंत मार्गदर्शन करावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट, माहिती देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि सादर होणाऱ्या दर्जेदार अर्जांची संख्या याबाबत स्पष्ट कृती आराखडा तयार करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Jal Jeevan Mission: राज्यातील ६,३५७ शाळा-अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे कडक शासन आदेश; १५ नोव्हेंबरची डेडलाईन!

कुठे अर्ज करणार?

तळागाळातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासन, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://sevainnovationchallenge.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज'साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

    Ans: या स्पर्धेसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

  • Que: या स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकते?

    Ans: नवोन्मेषक, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात.

  • Que: अर्ज करण्यासाठी कोणती अधिकृत वेबसाइट आहे?

    Ans: इच्छुकांनी [https://sevainnovationchallenge.in/](https://sevainnovationchallenge.in/) या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.

Web Title: Sewa first innovation challenge maharashtra registrations marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • education
  • Marathi News
  • navarahstra news

संबंधित बातम्या

Nagpur News : नेत्यांच्या आडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; एफडीए-पोलिसांचा धाक
1

Nagpur News : नेत्यांच्या आडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; एफडीए-पोलिसांचा धाक

Jal Jeevan Mission: राज्यातील ६,३५७ शाळा-अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे कडक शासन आदेश; १५ नोव्हेंबरची डेडलाईन!
2

Jal Jeevan Mission: राज्यातील ६,३५७ शाळा-अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे कडक शासन आदेश; १५ नोव्हेंबरची डेडलाईन!

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो
3

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा
4

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.