
फोटो सौजन्य सोशल मीडिया
माल आला की ‘तपासणी’चा खेळ ,व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिक नेत्यांचा गोदामे, ट्रान्सपोर्ट कार्यालये आणि दुकानांभोवती सतत वावर असतो. एखादा ट्रक माल घेऊन येताच ते तेथे पोहोचतात. मालाची पाहणी करण्याबरोबरच कागदपत्रे दाखविण्याचा आग्रह धरला जातो. त्यानंतर ट्रक, दुकान किंवा गोदामाचे रील तयार केले जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास एफडीए किंवा पोलिसांना बोलावून रेडची भीती दाखविली जाते.
विशेष म्हणजे संबंधित अधिकारीही या नेत्यांच्या फोनवर तातडीने घटनास्थळी पोहोचत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये आधीपासून समन्वय असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश
या प्रकाराबाबत पोलिस आयुक्त आणि एफडीए आयुक्तांकडे यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही वरिष्ठांना माहिती देण्यात आली, तक्रारीनंतर काही काळ हा प्रकार थांबतो, मात्र परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा तोच प्रकार सुरू होतो.
एफडीएकडून माल जप्त झाल्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत तो दीर्घकाळ अडकून राहतो. त्यामुळे व्यापारी कारवाई टाळण्यासाठी दबावाला बळी पडतात. व्यापाऱ्यांमध्ये एकजूट नसल्यामुळेही या प्रकाराला बळ मिळत असल्याचे सांगितले जाते. पोलिस आणि एफडीएच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची तयारी नसल्याने अनेक व्यापारी तक्रार करण्यापेक्षा परिस्थितीशी तडजोड करणे पसंत करतात.
Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो
किराणा, तेल, मसाले, दूध, पनीर आणि सुपारी व्यवसायातील व्यापारी या प्रकारामुळे त्रस्त असल्याचे सांगतात. मात्र, तपासणीचा निकाल येईपर्यंत माल अडकून राहतो आणि भांडवलही त्यात गुंतून पडते. त्यामुळे रेडच्या नावाने निर्माण होणारी भीती व्यापाऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहे.
७ ध्यापाराचे वातावरण चांगले आहे आणि ते कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. व्यापारी प्रतिष्ठानात रात्री-अपरात्री जाऊन ते उघडण्यास भाग पाडण्याची पद्धत योग्य नाही. अशा प्रकारांमुळे शहरातील व्यावसायिक वातावरणावर विपरीत परिणाम होतो. या विषयावर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाईल.