Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालार्थ आयडी घोटाळा, चौकशीला झाली सुरुवात! संस्थाचालकांसह सतरा जणांना नोटीस

जळगाव जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून १७ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधितांना १६ व १८ रोजी नाशिक येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 07, 2026 | 03:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह विविध तालुक्यांतील शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली असून संबंधित १७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना १६ व १८ रोजी नाशिक येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० मार्च २०१९ ते २६ जून २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आले आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये नियुक्ती प्रक्रियेतील जाहिरातींच्या मूळ प्रती, मुलाखतीची पत्रे, गुणपत्रक, नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे, शालार्थ प्रस्ताव आणि मंजुरीची मूळ कागदपत्रे यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक संस्थाचालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अमळनेर तालुक्यातील जिजाऊ विद्यालय भिलाली, सरस्वती विद्यालय पाडसे, शिवाजी हायस्कूल चौचारी, सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय झाडी, पंडित नेहरू विद्यालय फापोरे, महात्मा फुले विद्यालय पिंपळी आणि योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर या शाळांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इतर अनेक शाळांतील कर्मचारीही चौकशीच्या कक्षेत आले आहेत. नाशिक विभागात सुमारे ८९२ संशयित कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही सुरू असून काही संस्थाचालक फरार असल्याचे सांगितले जाते. चौकशीस हजर राहिल्यास अटकेची शक्यता असून गैरहजर राहिल्यास संबंधितांवर अधिक कठोर कारवाई होऊ शकते.

या चौकशीत तत्कालीन व विद्यमान मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात सुमारे १० जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून विविध पथकांमार्फत शेकडो कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी ! ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

एकंदरीत, मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याने संबंधितांची धावपळ उडाली असून दोषी आढळणाऱ्यांवर सेवा समाप्तीसह कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shalarth id scam inquiry begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
3

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
4

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.