श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेचे श्रीकृष्णाचा जन्मदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतामधील सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. यावर्षी सोमवार 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्णजन्माष्टमी सण आला असून बुधवारी 27 ऑगस्ट गोपाळकाला आहे. महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी मुंबई आणि परिसरात गोपाळकालाच्या दिवशी शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात येते. यासाठी शासनाकडून खास आदेश काढण्यात येतो. मुंबईप्रमाणेच देशातील अनेक राज्यांमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी अथवा गोपाळकाल्याची सुट्टी दिली जाते. मथुरा वृंदावनामध्ये तर अनेक दिवस या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. भाविकांची मांदियाळी मथुरेत असते.
श्रीकृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकाला
यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी देशात काही ठिकाणी 26 ला साजरी होणार आहे तर काही ठिकाणी 27 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये 26 ऑगस्टला जन्माष्टमी आणि 27 ऑगस्टला गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. मुंबई आणि परिसरात दहिहंडीचा मोठा उत्सव यानिमित्ताने साजरा केला जातो. अनेक दहिहंडी पथके उंच उंच मानवी मनोरे रचतात. अगदी जागतिक स्तरावर दहिंहंडी पथकांच्या मनोऱ्यांनी विक्रम केला आहे.
जन्माष्टमीला शाळा बंद राहणार का?
श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी म्हणजे जन्माष्टमीला विशेष तयारी केली जाते. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जरी काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या दिवशी सुट्टी देखील असते. यावर्षी जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 26 आणि 27 ऑगस्ट या दोन्ही दिवशी येत आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी २६ ऑगस्टला शाळा बंद राहतील, तर काही ठिकाणी २७ ऑगस्टला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे.
या ठिकाणी असेल जन्माष्टमीची सुट्टी
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भुनेश्वर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर इत्यादी ठिकाणी सुट्टी असेल. अशा स्थितीत या ठिकाणच्या शाळांना सुट्टी राहणार आहे. येथील शाळा बंद राहतील. मुंबई परिसरामध्ये लवकरच सरकारकडून गोपाळकाल्याच्या दिवशी सुट्टीचा आदेश काढला जाण्याची शक्यता आहे.