सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही देखील आगामी सेलची वाट बघत आहात का? सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी असते. त्यामुळे अनेक लोकं नवीन स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी सेलची वाट बघत असतात. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ते स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला सेलची वाट बघण्याची गरज नाही. हे असे स्मार्टफोन्स आहेत जे तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटशिवाय देखील कमी किंमतीत खरेदी करू शकतात.
अनेक स्मार्टफोन कंपन्या प्रिमियम आणि हाय रेंज स्मार्टफोन लाँच करण्यापेक्षा बजेट स्मार्टफोनला अधिक प्राधान्य देतात. सहसा लोकं त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोनची खरेदी करतात. अनेक कंपन्या कमी किंंमतीत दमदार फीचर्ससह बजेट स्मार्टफोन्स लाँच करतात. आता आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत कमी आहे. म्हणजेच हे स्मार्टफोन्स तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात. हे स्मार्टफोन्स 5G कनेक्टिव्हिटी आणि दमदार बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत कमी असली तरी देखील त्यांचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स अगदी दमदार आहेत. चला तर मग 10 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोन्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
iQOO च्या या स्मार्टफोनची किंमत अॅमेझॉनवर 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि 4GB/128GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 50MP डुअल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील आहे.
फ्लिपकार्टवर विवोच्या या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच HD+ LCD, 90Hz रिफ्रेश रेट, Dimensity 6300 आणि 4GB/128GB स्टोरेज देण्यात आले आहे. डिव्हाईसमध्ये 50MP डुअल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील आहे.
Tecno च्या या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच का HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Dimensity 6300 चिपसेट आणि 4GB/128GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे.
Infinix च्या या डिव्हाईसची किंमत 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि Dimensity 6300 चिपसेटसह 4GB/128GB स्टोरेज देण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP डुअल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील आहे.
itel च्या या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि Dimensity 6400 चिपसेट आणि 4GB/128GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील आहे.