
bank
Sindhudurg DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बँकेच्या विविध शाखांसाठी ‘क्लर्क’ (Clerk) पदाच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ निवासी असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.sindhudurgdcc.bank.in/recruitment2026) ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२६ असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान ४०% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने मॅट्रिक परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय बी.कॉम. (B.Com.), बी.ए. (B.A.), बी.एस्सी. (B.Sc. – IT/Agri/Maths/Statistics), बी.सी.ए. (B.C.A.) किंवा संगणक व आय.टी. क्षेत्रातील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल ४० वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर १९८६ पूर्वी आणि ३१ ऑगस्ट २००५ नंतर झालेला नसावा.
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीच्या १८ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा १८,००० रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची बँकेच्या नियमित क्लर्क ग्रेडमध्ये नियुक्ती केली जाईल आणि बँकेच्या नियमानुसार वेतनश्रेणी लागू होईल. या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ९०० रुपये (७६३ रुपये + १८% जीएसटी) इतके असून, ते ऑफलाईन पद्धतीने भरून त्याचा तपशील अर्जात नमूद करावा लागेल. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार असून, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या