Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त बँक खाते उघडून चालणार नाही! स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही मिळायला हवे; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

Governor Jishnu Dev Varma on Rural Financial Inclusion: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी वित्तीय समावेशनाचा विस्तार बँक खाती आणि डिजिटल व्यवहारांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लघुउद्योजकांना परवडणारे कर्ज, विमा व पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 08:37 PM
Governor Jishnu Dev Varma

Governor Jishnu Dev Varma

Follow Us
Follow Us:
  • वित्तीय समावेशनाचा विस्तार करा
  • कर्जासोबत विमा आणि पेन्शन कवचही द्या
  • राज्यपालांचे आवाहन
मुंबई: “वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. ‘असोचॅम’च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. “रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज” या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली.

Relief for livestock farmers : दुष्काळात पशुपालकांना दिलासा! वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार, शेतकरी गटांना २० हजारांचे चारा बियाणे

उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, “बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत. तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप देत असताना, आपण एक अशी स्थिर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय प्रणाली उभारली पाहिजे, जिथे कर्ज उत्पादक क्षेत्रांपर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान जनतेची सेवा करेल आणि वित्तीय संधी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विस्तारतील.”

भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आकांक्षांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकताना इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अतुल कुमार गोयल म्हणाले, “२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताचे बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे मुख्य उत्प्रेरक ठरू शकते. या महत्त्वाकांक्षेला पाठबळ देण्यासाठी या क्षेत्राने आर्थिक विकासाच्या संधी खुल्या करणे, उत्पादकता वाढवणे, डिजिटल परिपक्वता साध्य करणे आणि मजबुती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीकरणीय ऊर्जा, सेमीकंडक्टर्स आणि एमएसएमई यांसारख्या नवोदित क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा मजबूत करणे, एआईचा वापर करणे आणि सायबर सुरक्षा समाविष्ट करणे या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”

‘असोचॅम’चे अध्यक्ष श्री. निर्मल के. मिंडा यांनी सुशासनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करत पायाभूत सुविधा, एमएसएमई वाढ, उत्पादन, गृहनिर्माण, कृषी आणि नवोदित उद्योगांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. डिजिटलायझेशन, फिनटेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात विश्वास, पारदर्शकता, मजबूत सुशासन, सायबर सुरक्षा आणि जबाबदार कर्जवाटप हेच वित्तीय प्रणालीचे आधारस्तंभ राहिले पाहिजेत.”

‘असोचॅम’ नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंगचे सह-अध्यक्ष आणि येस बँकेचे कार्यकारी संचालक श्री. मनिष जैन म्हणाले, “पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, एमएसएमईंना सक्षम करणे आणि ऊर्जा संक्रमणास पाठबळ देण्यात वित्तीय क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ॲडव्हान्स्ड डिजिटल अंडररायटिंग, इकोसिस्टम-आधारित वित्तपुरवठा मॉडेल आणि जागतिक मूल्य साखळीत लहान व्यवसायांचे अधिक एकत्रीकरण याद्वारे एमएसएमई क्षेत्रातील ३० ट्रिलियन यूएस डॉलरची पत-तूट भरून काढणे सर्वसमावेशक विकासाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे.”

या परिषदेत असोचॅम ईवाय नॉलेज रिपोर्ट चे अनावरण करण्यात आले. तसेच बँकिंग आणि वित्तीय कर्ज पुरवठा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा आणि दिग्गजांचा विशेष सत्रात सत्कार करण्यात आला. परिषदेचा समारोप ‘असोचॅम’चे सरचिटणीस श्री. सौरभ सान्याल यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सरकार, नियामक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Mumbai: तिकीट नाही, चक्क मेट्रोचा पासपोर्ट! एम एम आर सी कडून भारतातील पहिल्या स्टेशन स्टॅम्प ट्रेलच्या विक्रीस प्रारंभ

Web Title: Governor jishnu dev varma financial inclusion affordable loans insurance pension pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Bank
  • digital
  • Maharashtra Governor

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार
2

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan
3

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.