Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Singapore Reading Campaign: रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, जाणून घ्या

Singapore Reading Campaign: रील्स आणि शॉर्ट-फॉर्म कंटेंटच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरच्या National Library Board कडून ReadSG उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात दररोज किमान १५ मिनिटे पुस्तक किंवा दीर्घ लेख वाचून त्याची नोंद केल्यास व्हर्च्युअल कॉइन्स मिळू शकतो. त्यासाठी काय करावं लागणार?

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 05:42 PM
रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, कसं ते जाणून घ्या...

रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, कसं ते जाणून घ्या...

Follow Us
Follow Us:
  • ५० दिवस रोज १५ मिनिटे वाचन केल्यास काय मिळणार?
  • जाणून घ्या सिंगापूरच्या ReadSG मोहिमेबद्दल
  • रोज फक्त १५ मिनिटे पुस्तक वाचा अन् मिळवा रिवॉर्ड!
Singapore Reading Campaign: स्मार्टफोन, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंच्या युगात दीर्घकाळ एखादे पुस्तक किंवा लेख वाचण्याची सवय कमी होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ReadSG उपक्रम राबवण्यात येत आहे. सिंगापूरच्या National Library Board (NLB) च्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये नियमित आणि सखोल वाचनाची सवय विकसित करणे हा आहे

रोज १५ मिनिटे वाचन

या उपक्रमांतर्गत सहभागी व्यक्तीला दररोज किमान १५ मिनिटे पुस्तक किंवा दीर्घ स्वरूपातील मजकूर वाचण्यास प्रोत्साहित केले जाते. वाचन पूर्ण झाल्यानंतर संबंधित रीडिंग अ‍ॅक्टिव्हिटीची ऑनलाइन नोंद करावी लागते. यासाठी वाचकांना व्हर्च्युअल कॉइन्ससारखे रिवॉर्ड मिळतात. प्रत्येक पात्र १५ मिनिटांच्या रीडिंग सेशनसाठी २० व्हर्च्युअल कॉइन्स मिळतात आणि एका दिवसात एक सेशन पात्र ठरते.

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

५० दिवसांचा हिशोब काय?

दररोज २० कॉइन्सप्रमाणे ५० दिवस वाचन केल्यास एकूण १,००० व्हर्च्युअल कॉइन्स जमा होतात. १,००० कॉइन्सचे मूल्य १ सिंगापूर डॉलर इतके आहे. म्हणजेच हा उपक्रम मोठी कमाई करण्यापेक्षा नियमित वाचनासाठी छोट्या प्रोत्साहनावर भर देतो.

शॉर्ट व्हिडिओंच्या काळात दीर्घ वाचनावर भर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स, शॉर्ट्स आणि इतर काही सेकंद किंवा मिनिटांच्या कंटेंटचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुस्तक, संशोधनपर लेख किंवा अन्य दीर्घ मजकूर सलग वाचण्यासाठी लागणारा वेळ कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

ReadSG च्या माध्यमातून नागरिकांना पुन्हा दीर्घ स्वरूपातील मजकुराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. NLB च्या भूमिकेनुसार सखोल वाचन हे एकाग्रता, चिकित्सक विचार आणि कल्पनाशक्तीला चालना देण्यास उपयुक्त ठरू शकते.

केवळ पैसे कमावण्याची योजना नाही

या उपक्रमाकडे ‘१५ मिनिटे वाचा आणि पैसे कमवा’ एवढ्यापुरते पाहणे दिशाभूल करणारे ठरू शकते. रिवॉर्ड हा वाचनासाठी प्रोत्साहनाचा भाग आहे; नियमित वाचनाची सवय निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

वाचनाच्या सवयींबाबत अभ्यासात काय?

सिंगापूरमधील वाचनाच्या सवयींबाबतच्या अभ्यासांमध्ये डिजिटल आणि शॉर्ट-फॉर्म कंटेंटकडे वाढणारा कल अधोरेखित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुस्तकांसह दीर्घ स्वरूपातील मजकूर वाचण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यावर NLB भर देत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

Web Title: Singapore readsg campaign read 15 minutes daily earn virtual coins national library board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • digital
  • Singapore
  • study

संबंधित बातम्या

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला
1

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.